Home Education राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने “भारतीय संविधान दिन” साजरा

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने “भारतीय संविधान दिन” साजरा

257

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.26 नोव्हेंबर):-येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. माधवराव कदम, उपप्राचार्य डॉ. व्ही. पी कदम, डॉ. डी. व्ही. तायडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले. तसेच आज महाविद्यालयाचे आधारवड व लोकनेते स्वर्गीय ॲड. अनंतरावजी देवसरकर साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम झाला व त्यानिमित्य त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले, यासोबतच आज विधी दिवस असल्यामुळे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक व्ही. एस. इंगळे व व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून विधी दिवसा निमित्य पोस्टर प्रेसेंटेशन करून साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी उमरखेड न्यायालयातील सन्माननीय न्यायाधीश हे उपस्थित होते.

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.

अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. ए. पी. मिटके, कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. इंगळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

सौंदर्य…..?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here