Home महाराष्ट्र ज्ञानेश्वर जुमनाके यांचा आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार

ज्ञानेश्वर जुमनाके यांचा आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार

186

🔹राष्ट्र सेवा दल व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.27नोव्हेंबर):- तालुक्यातील पत्रकार ज्ञानेश्वर जुमनाके यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्र सेवा दल तथा वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.आदिवासीसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनामुळे गोंड जमातीतील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या परिवर्तनाचे अध्ययन हा त्यांचा शोधप्रबंधाचा विषय होता.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुकबधिर विद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर लोथे होते.प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्र सेवा दल सैनिक मोतीराम कुळमेथे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पिसे,नीलकंठ शेंडे, रामदास कामडी,सुरेश डांगे आदी उपस्थित होते.

तालुक्यातील पत्रकार ज्ञानेश्वर जुमनाके यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची आचार्य पदवी मिळविल्याबद्दल त्यांचा राष्ट्र सेवा दल तथा वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रास्ताविका, सन्मानचिन्ह व आमदार कपिल पाटील लिखित पुस्तक देऊन अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना डॉ. ज्ञानेश्वर जुमनाके म्हणाले,अतिशय बिकट परिस्थितीतून आपण इथपर्यंत पोहचलो हे जरी सत्य असले तरी हे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेमुळे घडले. बाबासाहेबांनी देशाला सर्वांगसुंदर असे संविधान दिले. त्या संविधानामुळे आपण ताठ मानेने जगू शकत आहोत. संविधानाचे संरक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. ती आपण सर्वांनी करूया. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाला आणि देशाला झाला पाहिजे असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना त्यांनी केले.

कार्यक्रमाला राष्ट्र सेवा दलाचे इम्रान कुरेशी,अंगणवाडी कर्मचारी सभेच्या माधुरी वीर,ऍड.नितीन रामटेके,रमेश दांडेकर,मारोती नन्नावरे,श्रीकृष्ण जिल्हारे, शकील शेख, कवडू लोहकरे,सुरज मोरे, आशिष वाघमारे, कवडू निकेश्वर, पानसे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य सुरेश डांगे यांनी केले. संचालन राष्ट्र सेवा दल जिल्हा कार्याध्यक्ष रावण शेरकुरे यांनी केले. आभार कैलास बोरकर यांनी मानले. आयोजनासाठी राष्ट्र सेवा दल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुकबधिर विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here