Home महाराष्ट्र पारडगाव येथील युवकाने महापुरुषांच्या वैचारिक विचारांची प्रेरणा घेऊन मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय

पारडगाव येथील युवकाने महापुरुषांच्या वैचारिक विचारांची प्रेरणा घेऊन मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय

453

🔸आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन घेतला निर्णय

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.25 नोव्हेंबर):- ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथील सुभाष नारायण बगमारे वय 28 असुन हे सर्वसाधारण कुंटुबातील युवक असुन अनेक वर्षांपासून ते महापुरुषांच्या वैचारिक विचारांचे पुस्तक वाचन करत असतात. आणि तालुक्यात महापुरुषांच्या वैचारिक विचारांचा प्रचार- प्रसार करत आहेत. वर्तमान काळातील जिवनात आपण काय करतो यापेक्षा आपण काय करू शकतो. याकडे युवकांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

सुभाष नी महापुरुषांचे विचार आत्मसात करून आपण अनेक वर्षांपासून आपल्या मनात मरणोत्तर देहदान करण्याची संकल्पना घेतली.वाढदिवस म्हटले की कोणी गिफ्ट तर कोणी मनी पॉकेट भेट दिली जाते.पण सुभाष नी चक्क आपल्या आईचा वाढदिवसाच्या दिवशीच आपल्या आईला आपण मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेऊन एक मोठी भेट दिली. आपण जर सध्याच्या परिस्थितीत बघितले तर दानशूर व्यक्ती खूप कमी बघायला मिळत असतात.पण अजूनही सुभाष सारखी तरूण युवक समाजात आहेत. तो पर्यंत महापुरुषांच्या वैचारिक विचारांना उजाळा मिळत राहिल. सुभाष नी आपण जन्माला आले आहे तर आपला हा देह कुणाच्या तरी उपयोगी यावे. हीच इच्छा बाळगून सुभाष नी आपल्या मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला. व यांनी निर्णयामुळे सुभाष चा तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

माझा मुलगा खूप गुणी आहे. मला माहीत नाही त्याला काय करायचे आहे. पण आज मला खूप अभिमान वाटतो आहे की माझ्या जन्मदिवस आणि माझा सुभाष आपल्या मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला.

विठाबाई नारायण बगमारे
सुभाष ची आई

जगातील सर्व धार्मिक ग्रंथांचा गुरु- महागुरु!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here