Home Education राजगुरुनगर येथील शाळेत नन्ही कली उपक्रमांतर्गत सर्व मुलींना स्कूल बॅग व लेखन...

राजगुरुनगर येथील शाळेत नन्ही कली उपक्रमांतर्गत सर्व मुलींना स्कूल बॅग व लेखन साहित्यांचे वाटप

98

✒️राजगुरुनगर विशेष,प्रतिनिधी(मनोहर गोरगल्ले)

राजगुरुनगर(दि-२४नोव्हेंबर):-शैक्षणिक वर्ष2022/23 मधील यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत खेड बीटच्या स्तरावरील सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळकरवाडी येथे संपन्न झाल्या त्यामध्ये खो-खो या क्रीडा प्रकारात मुलींच्या लहान गटामध्ये जिल्हा प्राथमिक शाळा राजगुरुनगर क्रमांक 2( मुलींची) या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल खो-खोच्या संघामधील सर्व मुलींना चषक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सदर सन्मान गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे साहेब व केंद्रप्रमुख श्री दत्तात्रय गोसावी साहेब यांच्या शुभ हस्ते सर्व मुलींना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर त्याचबरोबर शाळेत सुरू असलेल्या नन्ही कली उपक्रमांतर्गत सर्व मुलींना स्कूल बॅग व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री मंगेश दादा गुंडाळ व टाकळकरवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दत्तात्रय गोसावी यांनी मुलींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आबादी की चिंता की आड़ में सांप्रदायिक राजनीति!

शाळेचे मुख्याध्यापक श्री सत्यवान शितोळे खोखो संघाचे मार्गदर्शक श्री उत्तमराव पाषाणकर सौ उल्का शिंदे श्रीमती वैजयंती थोरात सौ जयश्री आरुडे श्रीमती सविता पवार या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले तसेच नन्ही कली टीचर्स सौ साळवे मॅडम व सौ घुमटकर मॅडम यांचे अभिनंदन करण्यात आले.

संविधान दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव

चला भारतीय संविधान समजून घेवूया!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here