Home महाराष्ट्र कर्तव्य बहुदेशिय संस्थातर्फे निखिल ठाकुर यांचा विशेष सत्कार

कर्तव्य बहुदेशिय संस्थातर्फे निखिल ठाकुर यांचा विशेष सत्कार

115

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.22नोव्हेंबर):-धरणगावच्या कर्तव्य बहुदेशिय संस्था तर्फे निखिल ठाकुर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या” सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक” मुख्य परीक्षा 2020 – या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक 21 /11/ 2022 रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार एकूण 233 उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता अंतिम निवड करण्यात आली आहे.

अमळनेर येथील निखिल ठाकूर याची सहायक मोटर वाहन निरीक्षक ( आर.टी.ओ. ) पदी निवड झाल्याबद्दल आय.पी.एस.आधिकरी विश्वास नांगरे पाटील यांचा लिखित ग्रंथ ” मन मे हे विश्वास ” हा ग्रंथ भेट देण्यात आला. यात निखिल अनिल ठाकूर याची वरील पदाकरिता पहिल्याच प्रयत्नात “निवड” झाली असून त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या यशाचे संपूर्ण श्रेय निखिल आपला परिवार तसेच त्याचे गुरुवर्य यांना प्रदान करीत आहे. सत्कार प्रसंगी कर्तव्य बहुदेशिय संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, प्रा.डॉ.सुभाष महाजन मुख्याध्यापक हिम्मत चौधरी, वडील अनिल आप्पा ठाकूर सोबत अनिल चौधरी, शरद चौधरी, गोपाल चौधरी इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ.सुभाष महाजन यांनी केले व आभार सुनील महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम डॉ.मयुरी शुभाष महाजन, भैय्या भाऊ महाजन, मनीष चौधरी यांनी घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here