Home महाराष्ट्र श्री सत्यसाई बाबा जयंती निमित्त मांडवा येथे मेडिकल कॅम्प संपन्न

श्री सत्यसाई बाबा जयंती निमित्त मांडवा येथे मेडिकल कॅम्प संपन्न

103

🔸भगवान श्री सत्यसाई बाबा सेवा पुसदची मांडवा स्मशानभूमीला भेट

✒️बळवंत मनवर(विशेष प्रतिनिधी)

पुसद(दि.22नोव्हेंबर):- भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या ९७ व्या जयंती निमित्त भगवान श्री सत्यसाई बाबा सेवा समिती पुसद यांच्या वतीने पुसद तालुक्यातील मांडवा येथे दि .२२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रागंणात मेडिकल कॅम्प घेण्यात आला होता.

संपूर्ण नियोजन सत्यसाई सेवा समिती निमंत्रक डॉ. संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

या कॅम्पमध्ये एकूण २०५ पेशंट तपासुन विनामूल्य औषध वाटप करण्यात आले . मेडिकल कॅम्पसाठी डॉ. विहार बिडवाई व त्यांची संपूर्ण टीम , तसेच डॉ.मधुकर कन्नावार, डॉ. लखन जयस्वाल ,डॉ. संदीप चव्हाण, डॉ. सुधीर पापींवार, राम दिगलवार , अशोक पुरोहित, शशिकांत अत्तरदे , बालाजी बंडेवार, गजानन अरगुलवार, प्रशांत पालकृतवर, अजय विश्वकर्मा, अरुण धुमाळ, इंगळे, कांता पुरोहित, मंगला अतरदे, कीर्ती काजळे , कल्पना जयस्वाल, ममता चव्हाण,स्मिता अरगुलवार, वैशाली रणमले, स्वप्निल गोरे, औंकार चव्हाण, तसेच मांडवा प्रतिष्ठत नागरिक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मांडवा येथील लोकसभागातून सोयी सुविधा पूर्ण करण्यात आलेल्या शांती धामला भेट देऊन निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या कैलास राठोड व बाळासाहेब ढोले तसेच सर्व ग्रामस्थांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here