Home महाराष्ट्र शिक्षक बँकेच्या निवडणुकीत म्हसवड विभागात समितीचाच वरचष्मा ; अटीतटीच्या लढतीत विजय,विजय बनसोडे...

शिक्षक बँकेच्या निवडणुकीत म्हसवड विभागात समितीचाच वरचष्मा ; अटीतटीच्या लढतीत विजय,विजय बनसोडे यांचाच

299

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी, म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.22नोव्हेंबर):- शिक्षक बँकेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत बॅकेच्या इतिहासात दुरंगी लढती मध्ये संघाच्या सर्वात जास्त मतदारसंघ संख्या व सर्व म्हसवड मधील संघाचे मातंबर शिक्षक नेते एकत्र असताना निसटता विजय सभासद परिवर्तन पॅनेलचे उमेदवार विजय बनसोडे यांनी २ मतांनी विजयीश्री खेचून आणला त्यांनी केलेले सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कोल्ही मधील कामच या विजयाचे साक्षीदार आसुन या विजया मध्ये खरे किंगमेकर लक्ष्मण काळे, मधुकर कांबळे, सोमनाथ शेटे, सतिश कुंभार,सुशील त्रिगुणे, प्रमोद मंगरुळे आदी शिक्षक ठरले तर . सभासद विकास आघाडी पॅनेलचे उमेदवार राजाराम तोरणे यांना दुसऱ्यांदा बॅकेत पराभव झाला.या विजयाचा जल्लोष फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी बनसोडे यांचा अनेकांनी त्याचा सत्कार केला केला.

विजय बनसोडे यांनी प्रचारात सुरवातीपासून आघाडी घेतली होती. शनिवार विक्रमी मतदान झाले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून विजय बनसोडे व राजाराम तोरणे यांच्यात अटीतटीची लढाई सुरू होती. अखेर या अटीतटीच्या लढतीत विजय बनसोडे २ मतांनी विजयी झाले.. निवडणुकीच्या काळात विजय बनसोडे व सभासद परिवर्तन पॅनेलचे ज्येष्ठ नेतेमंडळी, कार्यकर्ते, महिला शिक्षिका व सेवानिवृत्तांनी मतदारसंघात हायटेक मायक्रो प्लॅनिंग करून केंद्रनिहाय भेटी, कोपरा सभा, पदयात्रा, घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी, मेळावे, महारॅली व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. म्हसवड मतदारसंघाची जागा आम्हीच जिंकू अशी वल्गना विरोधक करीत होते. मात्र, बनसोडे यांना प्रचारकाळात मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता विरोधकांनी अक्षरशः नांगी टाकल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले.

तोरणे यांच्या पराभवास तत्कालीन संचालकांची कारकीर्द व चमकोगिरी करणारी मंडळी जबाबदार आहेत. या पराभवाचे आत्मचिंतन सभासद विकास पॅनलने करावे, अशी प्रतिक्रिया सभासद परिवर्तन पॅनलच्या अनेकांनी व्यक्त केली.४२६ मतदानापैकी विजय बनसोडे यांना २११ तर राजाराम तोरणे यांना २०९ मते मिळाली ६ मते बाद झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here