Home महाराष्ट्र आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या शुभहस्ते ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथे विविध विकासकामांचे...

आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या शुभहस्ते ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

375

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 19 नोव्हेंबर) :- आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या शुभहस्ते ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथे हायब्रीड अन्युटी अंतर्गत पॅकेज क्र. 167 मध्ये अद्भिवणाऱ्या व्याप्ती बदल (Change of Scope) मधुन अऱ्हेर-नवरगाव येथील अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व कॉक्रिट नालीचे व पेव्हर ब्लॉक चे बांधकाम (अंदाजीत किंमत : 3 कोटी 5 लक्ष) अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.

सदर भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार बंटीभाऊंनी उपस्थित जनतेला विविध विषयांवर संबोधित केले. श्री हनुमान मंदिर देवस्थान सौंदर्यीकरणाकरिता 10 लक्ष व सामाजिक सभागृह बांधकामाकरिता 30 लक्ष निधी उपलब्ध करून देणार अशी ग्वाही दिली. तसेच, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या धान काट्याचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, अऱ्हेर-नवरगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे सदर विकासकार्याबद्दल विशेष स्वागत व शाल-श्रीफळ देऊन सत्कार करून आभार व्यक्त केले.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपा जिल्हा महामंत्री क्रीष्णाभाऊ सहारे, भाजपा जिल्हा सचिव दिपाली मेश्राम, भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, सभापती – कृ.ऊ.बा. समिती नागभीड अवेश पठाण, भाजपा नेते रवि मेश्राम, माजी उपाध्यक्ष – न.प. नागभीड गणेश तर्वेकर, माजी बांधकाम सभापती – न.प. नागभीड सचिन आकुलवार, अमरदीप राखडे, रमेशभाऊ बोरकर, उमाकांत कुथे, मुन्नाजी कावळे, मनोज ढवळे, विलास उरकुडे, सुनंदा ढोरे, श्याम शामकुळे, अक्षय चहांदे, मोरेश्वर दर्वे, सुयोग बाळबुद्धे, योगेश राऊत, मनोहर मेश्राम, पोमराज सूर्यवंशी, सिद्धेश्वर भरे, अमित मेंढुले व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here