Home महाराष्ट्र राजेश ढोले यांचा समाजरत्न, व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरव!

राजेश ढोले यांचा समाजरत्न, व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरव!

91

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.19नोव्हेंबर):- रिपब्लिकन वार्ताच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मायको हॉल सिंहस्थ नगर, सिडको नाशिक येथील झालेल्या कार्यक्रमात रिपब्लिकन वार्ता चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी, तथा प्रज्ञापर्व समिती पुसद 2022 चे उपाध्यक्ष मा.राजेश ढोले साहेब यांना राजकीय, पत्रकार, क्षेत्रात तसेच सामाजिक योगदाना बद्दल, व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय, समाजरत्न व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कामगार नेते सिटू या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, डॉ. डी एल. कराड, नाशिकचे सहाय्यक आयुक्त मयूर जी पाटील वंचित आघाडीचे अविनाश शिंदे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे समन्वयक प्रा. श्रीकांत सोनवणे, पुरोगामी पत्रकार संघाचे मा. श्रीकांत पगारे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे, अध्यक्ष नानासाहेब कटारे, विश्वगामी पत्रकार संघाचे विजय निकम इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार व सन्मान चिन्ह देण्यात आले.

सोहळ्याकरिता प्रामुख्याने उपस्थित रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनी समूहाचे मुख्य संपादक, आ. डॉ. अनिलजी आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद, निवासी कार्यकारी संपादक डॉ. प्रा. व्यंकटराव् कांबळे, सुनील आठवले, केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, दैनिक अधिकार पुसद प्रतिनिधी कैलास श्रावणे, फुलंब्री चे प्रतिनिधी अकबर शहा नारीशक्ती महिला अध्यक्ष वाशिम, उषाताई वानखेडे इत्यादी प्रमुख पाहुणे या प्रमुख सोहळ्याला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here