Home महाराष्ट्र मेन राजाराम महाविद्यालयांच्या स्थलांतरास भारतीय विध्यार्थी मोर्चाचा विरोध; जिल्हाधिकारी यांना निवेदन

मेन राजाराम महाविद्यालयांच्या स्थलांतरास भारतीय विध्यार्थी मोर्चाचा विरोध; जिल्हाधिकारी यांना निवेदन

89

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी, म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.19नोव्हेंबर):- कोल्हापूर येथील मेन राजाराम कॉलेज, हायस्कूल ता.करवीर जिल्हा.कोल्हापूर ही शाळा स्थलांतरित होत आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. करवीर संस्थान अधिपती लोकराजा शाहु महाराज यांचे दुसरे राजाराम महाराज यांच्या शैक्षणिक धोरणामुळे संस्थानाच्या राजवटीमध्ये ही शाळा सुरु झाली होती. या शाळेला ऐतिहासिक महत्वाबरोबरच सामाजिक महत्व देखील आहे. या शाळेतुन अनेक गरिब विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठमोठे अधिकारी झालेले आहे. सध्या याच शाळेमधुन अनेक गोरगरिबांची मुले येथे शिक्षण घेत आहेत. यामुळे या शाळेचे महत्व खुप आहे.त्यामुळे शाळा स्थलांतर होऊ नये म्हणून भारतीय विध्यार्थी मोर्चा कडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणेत आले.

या निवेदनात म्हटले आहे अलीकडेच कोल्हापूरचे पालकमंत्री मा.दिपक केसरकर यांनी या शाळेची पाहणी करुन येथील शाळा स्थलांतरित करण्यात यावी अशा सुचना केल्या आहेत असे स्थानिक चौकशी वरून समजत आहे. शाळा स्थलांतरित करुन याठिकाणी यात्री निवास करण्यात येणार आहे अशी चर्चा सुरु झाली असून या हायस्कूल स्थलांतरित होण्याला भारतीय विद्यार्थी मोर्चाचा विरोध आहे
कोल्हापूर नगरीला छत्रपती शाहु महाराज यांच्या विचारांचा आणि आचारांचा वारसा लाभलेला आहे. छत्रपती शाहूजी महाराज यांनी नेहमीच अन्यायाला आळा घातलेला आहे. मेन राजाराम हायस्कूल ही शाळा स्थलांतरित करुन विद्यार्थी व याठिकाणाची ओळख पुसुन समस्त करवीर वासीयांच्यावर प्रशासनाच्या आणि शासनाच्या माध्यमातून अन्याय केला जात आहे.

म्हणून आज आम्ही मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यामार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन त्यांनी या संबंधित विषयांवर येत्या 48 तासांत लेखी खुलासा करावा अन्यथा या गोष्टीचा निषेधार्थ करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात रविवार दि.20 नोव्हेंबर 2022 ला भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने मेन राजाराम हायस्कुल समोर बोंबमारो आंदोलन करू अशी भूमिका आम्ही घेत आहोत.
हे निवेदन देण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण कांबळे, सागर सुतार,मदन सरदार , निलेश शिंदे ,ओंकार पांढरे आदी पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here