Home चंद्रपूर विवेकानंद विद्यालयाचा खो-खो संघ जिल्हा स्तरावर

विवेकानंद विद्यालयाचा खो-खो संघ जिल्हा स्तरावर

136

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.18नोव्हेंबर):- तालुका क्रीडा संकुल वरोरा येथे आयोजित केलेल्या शालेय तालुकास्तरीय १४ वर्षाखालील खो-खो(मुली ) व १७ वर्षाखालील खो-खो (मुले )स्पर्धेत तालुका क्रीडा संकुल वरोरा येथे नियमित सराव करणाऱ्या व विवेकानंद विद्यालय वरोराच्या विध्यार्थ्यांचा संघ विजेते ठरलाअसून , १४ वर्षाखालील मुलींचा व १७ वर्षाखालील मुलांचा असे दोन्ही संघ जिल्हा स्तरासाठी पात्र ठरले आहेत.

या दोन्ही संघातील खेळाडूंचे सुधीर कुंभारे , जांभुळे सर , स्वप्नील सायंकार व उरकांदे सर यांचे नियमित मार्गदर्शनाखाली सराव घेतल्या जाते. त्या दोन्ही संघांच्या सराव आणि परिश्रमाने मिळवलेल्या यशाबद्दल अशोक मोरे , विजय ढोबळे , तालुका संयोजक मुसळे संस्थेचे अध्यक्ष टेंमुर्डे , संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे , विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ठेंगणे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here