Home गडचिरोली भारत जोडो यात्रे करिता शेकडो कार्यकर्ते रवाना, पातूर येथून होणार यात्रेत सहभागी

भारत जोडो यात्रे करिता शेकडो कार्यकर्ते रवाना, पातूर येथून होणार यात्रेत सहभागी

90

🔸जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा पुढाकार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.16नोव्हेंबर):-काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबर पासून भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली असून यात्रेचा मुख्य उद्देश देशात निर्माण झालेल्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय विषमता धार्मिक भेद दूर करून लोकांना जोडणारी आहे. ही पदयात्रा कन्याकुमारी ते कश्मिर अशी 3500 किमी चा प्रवास करणार आहे. या पदयात्रे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी शेतकरी, महिला, बेरोजगार, युवक अश्या अनेक नागरिकांशी भेटून संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या यात्रेचे महाराष्ट्रात 7 नोव्हेंबर रोजी आगमन झाले असून 17 नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील हजारो पदयात्री बाळापूर (अकोला) पासून यात्रेत सहभागी होणार आहेत याकरिता जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते 16 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या विविध भागातून पातूर च्या दिशेने रवाना झाले.

यावेळी कार्यकर्त्या समवेत ‘नफरत छोडो भारत जोडो’ चे नारे देत कार्यकर्त्याचा उत्साह वाढवतांना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. आनंदराव गेडाम, माजी आम. पेंटाराम तलांडी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, परीवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, काँग्रेस नेते समशेरखान पठाण, शंकरराव सालोटकर, कुरखेडा तालुका अध्यक्ष जीवन पा. नाट, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, नेताजी गावतुरे, रमेश चौधरी, जयंत हरडे, प्रभाकर तुलावी, मुस्ताक हकीम, गिरीधर तितराम भैयाजी मुद्दमवार, अब्दुल पंजवानी, चारूदत्त पोहने, भूपेश कोलते, संजय चंने, सुधीर बांबोळे, मोहन नामेवार, विजय चाटे, स्वप्नील ताडाम, वसीम शेख, अभय नाकाडे, सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक देखील या पदायत्रेत सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here