Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिलाध्यक्षा डॉ.सुधाताई कांबळे राष्ट्रीय पुरस्काराने...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिलाध्यक्षा डॉ.सुधाताई कांबळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

73

🔸राष्ट्रीय स्तरावरचा आणाभाऊ साठे सामाजभूषण पुरस्कार प्रदान

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.8ऑगस्ट):-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती पर्व, दिल्ली लोकशाहीर जनकल्याण समिती, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई हरीश कांबळे यांना राष्ट्रीय स्तरावरचा अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री विनय सहस्रबुदधे, डॉ. शिवलिग शिवाचार्य महाराज, अशोक मेंढे, माजी आमदार राम गुंडीले, संयोजन समितीचे मुख्य सचिव विक्रम सोळसे, अध्यक्ष विशवनाथ सदामते, शारदा डोलारे, दिलीप सोळसे, केशव सरवदे, मधुकर सोनवणे, कमलेश गायकवाड अविनाश महातेकर आदी मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here