Home महाराष्ट्र अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन सह हायवावर सिरसाळा पोलिसांची कार्यवाही – एक...

अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन सह हायवावर सिरसाळा पोलिसांची कार्यवाही – एक कोटीचा मुद्देमाल जप्त

123

✒️अतुल बडे(सिरसाळा प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.27मे):-येथील पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे तेलस्मुख शिवारात अज्ञात व्यक्ती कडून चोरी छूपके अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती सिरसाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांना मिळाली असता त्यांनी आपल्या सहकाऱ्यासह तेलसमुख येथील गोदावरी पात्रात गेले असता त्यांना अवैध वाळू उपसा करणारे टुटेन सह हायवा mh 44 9104 हा मिळून आल्याने त्वरित पोलीसांनी टुटेन सह हायवा ताब्यात घेऊन जप्त केला आहे. याबाबत पोलिसांकडून तहसीलदार यांना दिलेल्या पत्रकात महटले आहे की,

पोलिस स्टाफ सह तेलसमुख शिवारातील गोदावरी नदी पात्रात वाळूचा अवैध उपसा करीत असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी दिनांक 26 रोजी सकाळी 8: 30 वाजता च्या सुमारास छापा मारला असता सदर नदी पात्रात एक टूटेन सह mh 44 9104 ह्यामध्ये अंदाजे चार ब्रास वाळू रेती मिळून आले तरी सदरील टूटेन व हायवा वर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी असे पत्र सिरसाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी दिले आहे. ह्या धडाकेबाज कार्यवाही मुळे वाळू माफिया चे धाबे दणाणले आसून मागील अनेक दिवसांपासून सिरसाळा पोलीसांनी अवैध धंदे करणाऱ्यावर विविध प्रकारे काऱ्यवाही केल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल समाधान व्यक्त केला जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here