Home महाराष्ट्र वरुड मोर्शी तालुक्यातील ७२९१ आदिवासी बांधवांना मिळाला दिलासा !

वरुड मोर्शी तालुक्यातील ७२९१ आदिवासी बांधवांना मिळाला दिलासा !

241

🔹खडका पांढरघाटी येथे १६० आदिवासी बांधवांना खावटी अनुदान वाटप !

🔸आदिवासी बांधवांनी मदार देवेंद्र भुयार यांचे मानले आभार !

✒️वरुड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वरुड(दि 27मे):-जगभरात कोरोनाने थैमान घातले असतांना लॉकडाऊनमुळे आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. रोजगार व मोलमजुरी मिळणे बंद झाल्याने जीवन जगण्याचा प्रश्न बिकट झाल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी जनतेची होणारी उपासमार लक्षात घेऊन राज्यात खावटी कर्ज योजना तात्काळ सुरु करावी अशी मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लावून धरल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला.

आमदार देवेंद्र भुयार यांनी आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाह प्रश्नाकडे लक्ष वेधून खावटी कर्ज योजना सुरु करण्याची विनंती केली होती. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकासमंत्री के सी पाडवी, यांना विनाविलंब खावटी कर्ज योजना सुरु करण्याची मागणी केली असता यावर तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना दिले होते.

आदिवासी बांधव हे उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करिता शेजारील राज्यात व परराज्यात स्थलांतरित होतं असतात. बहुतांशी आदिवासी बांधव आदिवासी दुर्गम, अतिदुर्गम, दऱ्याखोऱ्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असून अनेक निराधार, वृध्द लाभार्थी असून लॉक डाऊन काळामध्ये रोजगार अभावी उपासमार टाळण्यासाठी वरुड मोर्शी तालुक्यातील खावटी कर्ज मंजूर प्रकरणे मंजूर करण्यात आले होते वरुड मोर्शी तालुक्यात ७२९१ खवटी कर्ज वाटप प्रकरणे निकाली काढून ७२९१ आदिवासी बांधवांना १ कोटी २० लक्ष रुपये वाटप करण्यात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला असून वरुड मोर्शी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यातील खडका पांडरघाटी येथील आदिवासी बांधवांकरिता “खावटी वाटप योजना”अंतर्गत आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते १६० पात्र आदिवासी लाभार्थ्यांना खावटी किट वाटप करण्यात आले आणि त्यांच्या खात्यात 2000 रुपये वर्ग करण्यात आले यावेळी खडका पांडरघाटी येथील सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य गावकरी मंडळी उपस्थित होती.

कोरोना काळामध्ये आदिवासी शेतकरी शेतमजूर अडचणीत असतांना मोर्शी वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव असून लॉक डाउनमध्ये त्यांना रोजगार नव्हता उत्पादन नव्हते त्यामुळे उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली होती त्यातून मार्ग काढण्यासाठी वरुड मोर्शी तालुक्यातील ७२९१ आदिवासी बांधवांचे खावटी कर्ज प्रकरणे निकाली काढून १ कोटी २० लक्ष रुपये वाटप करण्यात आले असून खावटी कर्ज योजना आदिवासी बांधवांसाठी फायद्याची ठरली —- आमदार देवेंद्र भुयार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here