Home महाराष्ट्र सिरसाळ्यात होणार भव्य दिव्य होळकर जयंती समारंभाला परळी तालुक्यातील धनगर समाज उपस्थित...

सिरसाळ्यात होणार भव्य दिव्य होळकर जयंती समारंभाला परळी तालुक्यातील धनगर समाज उपस्थित राहणार- गोरख काळे यांची माहिती

185

✒️सिरसाळा प्रतिनिधी(अतुल बडे)

परळी(दि.27मे):-तालुक्यातील सिरसाळा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी होणार असुन सिरसाळ्याच्या पंचक्रोशीतील ६० गावा सह परळी तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत राहणार असल्याची माहिती गोरख काळे यांनी दिली आहे. दिनांक ४ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणा मध्ये होळकर जयंती चे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण व यशस्वी झालेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कावळे, भगवान नवघरे, आश्विनी धापसे – नवघरे व अहमदनगर येथील डाॅक्टर डाॅ.परमेश्वर काळे ह्या समाज रत्नांचा सत्कार व सन्मान या वेळी करण्याचे आयोजित केले आहे. तसेच होणा-या ह्या जयंती कार्यक्रमास ना.धनंजय मुंडे यांच्या समावेत वाल्मिक आण्णा कराड, जिल्हा परिषदेचे गटनेते अजयजी मुंडे, माजी सभापती प्रभाकर वाघमोडे, माऊली तात्या गडदे, दिलिप आबा बिडगर, गोविंद फड, कल्याण आबुज, माधवराव निर्मळ, बालासाहेब दौडतोले,बंडूजी खांडेकर, शिवदास बिडगर, व्यकंटेश चामणसर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भव्य शोभा यात्रा सह वाजत गाजत, ढोल तासाच्या गजरात अहिल्याबाई होळकर जंयती उत्सव होणार असल्याची माहिती आयोजक समिती अध्यक्ष गोरख काळे यांनी दिली आहे. मोठ्या संख्येने धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक समिती माऊली तात्या गडदे, विकासराव बिडगर, व्यकंटेश काळे, ॲड. सतिश काळे, माजी उप सरपंच कल्याण काळे तसेच आयोजक समिती गोरख दादा काळे ( अध्यक्ष), शरद काळे ( उपाध्यक्ष), सुरेश नवले ( सचिव), नासर दादा शेख (कोषाध्यक्ष), आशोक जाधव ( सचिव), नितीन काळे ( कार्याध्यक्ष), राजेंद्र नाना जोशी ( महासचिव), गोविंद लोखंडे आदी समिती पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here