Home महाराष्ट्र धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक महामंडळाच्या वतीने प्रत्येक 1 लाख कर्जाचे...

धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक महामंडळाच्या वतीने प्रत्येक 1 लाख कर्जाचे फॉर्मचे डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते वाटप

77

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी वैजनाथ(दि.24मे) :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.)च्या वतीने व्हीजे एन.टी.1, एनटी 2, एनटी 3 च्या प्रत्येक 1 लाख रुपये थेट कर्ज योजनेंतर्गत अर्जाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक महामंडळाच्या वतीने VJ, NT1,Nt2,Nt 3 प्रत्येक 1 लाख कर्जाच्या फार्मचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे हस्ते वाटप करण्यात आले. बीड जिल्ह्यात 150 फाँर्म मंजूर झाले आहेत. दीड कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. युवकांना आता आपल्या स्वतः च्या पायावर उभे राहाण्यासाठी ही योजना लाभदायक ठरणार आहे.

या योजनेमध्ये लघु व्यवसाय उदा. मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, पॉवर टिलर,हार्डवेअर व पेंट शॉप, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स, स्टेशनरी, सलुन, ब्युटी पार्लर मसाला उद्योग, पापड उद्योग, मसाला मिर्ची कांडप उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, ऑटोरिक्षा, चहा विक्री केंद्र, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, डी. टी. पी. वर्क, स्विट मार्ट, ड्राय क्लिनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टीट्युट, ऑटो रिपेअरींग वर्कशॉप, मोबाईल रिपेअरिंग, गॅरेज, फ्रिज दुरुस्ती, ए. सी. दुरुस्ती, चिकन/मटन शॉप, इलेक्ट्रिकल शॉप, आईस्क्रिम पार्लर व इतर,मासळी विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान, टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग अशा लघु व्यवसायासाठी ही योजना सुरू करणे. या योजनेसाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला इ. लाभार्थीना तात्काळ व प्राधन्याने लाभ मिळणार आहे.वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.)च्या वतीने प्रत्येक 1 लाख रुपये थेट कर्ज योजनेंतर्गत अर्जाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here