Home महाराष्ट्र देवडी पुन्हा होणार पाणीदार

देवडी पुन्हा होणार पाणीदार

185

🔹देवडी बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाचा जिल्हाधिकारयांच्या हस्ते शुभारंभ

✒️वडवणी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वडवणी(दि.23मे):- तालुक्यातील देवडी गावाला पाणीदार करण्याची क्षमता असलेल्या देवडी येथील बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्या हस्ते आज झाला.न्या.दिलीप देशमुख आणि एस.एम देशमुख यांच्या प्रयत्नातून आणि सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून २०१८ मध्ये हा बंधारा बांधण्यात आला आहे.

बंधा-यावर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर रेणुका माता मंदिरात झालेल्या कार्यक्रमात बोलताना जिल्ह्याधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी बंधारयातील गाळ उपसण्याच्या सकाळ रिलीफ फंडाच्या कार्याचे कौतुक केले. गावकरयांनी देखील या कामात हातभार लावावा, सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.बंधारयाचा लाभ गावकरयांना झालेला आहे गाळ उपसून बंधारा व्यवस्थित केला तर पाणी साठवण क्षमता वाढेल आणि त्याचा गावकरयांना लाभ होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. गाळ उपसण्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी यांनी एक हजार रूपयांची मदत दत्ता देशमुख यांच्याकडे सुपूर्द केली.

देवडी गावात येण्यासाठी नदीवरील पुलाची उंची वाढवून मिळावी ही एस.एम देशमुख यांची मागणी मान्य करताना त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.एस.एम देशमुख यांनी प्रास्ताविकात बंधारा बांधण्यासाठी न्या. दिलीप देशमुख यांनी केलेले प्रयत्न आणि सकाळ रिलीफ फंडाने केलेल्या सहकार्याबददल त्यांचे आभार मानले.सकाळचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता देशमुख यांनी जातीने लक्ष घालून बंधारयाचे काम दर्जेदार केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.बंधारा व्हावा आणि देवडीतील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर व्हावी हे आमच्या वडिलांचे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण करता आले त्याबद्दल एस.एम देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी शर्मा, तहसिलदार भारस्कर, पीएसआय यादव, दत्ता देशमुख यांचा फेटा बांधून आणि शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे सूत्र संचालन अनिल वाघमारे यांनी केले तर आभार हरि पवार यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच जालंधर झाटे, मच्छिंद्र झाटे, यशवंत कुलकर्णी, विश्वास आगे, बाबासाहेब झाटे, तुळशीराम राऊत, पत्रकार नाईक,सुधाकर पोटभरे, पत्रकार सतिश सोनवणे, पत्रकार शांतीनाथ जैन, पत्रकार धम्मपाल डावरे, पत्रकार अविनाश मुजमुले, पत्रकार साबळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here