Home महाराष्ट्र डिजिटल भारतात इंग्रजी बोलता येणं गरजेचे आहे – प्रदिप ठाकरे

डिजिटल भारतात इंग्रजी बोलता येणं गरजेचे आहे – प्रदिप ठाकरे

87

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.22मे):- जग हे खूप बदललेले आहे. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला जर इंग्रजी भाषा बोलता येत नसेल तर ती भाषा बोलता आली पाहिजे याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्हाला जर इंग्रजी भाषा शिकायची आहे तर त्यासाठी इंग्रजी व्याकरणाकडे लक्ष दिले पाहिजे. इंग्रजी व्याकरणाचा प्रत्येक विषय हा समजणे खूप गरजेचे आहे. इंग्रजी व्याकरणाचा संपूर्ण भाग येत असेल किंवा समजला असेल तर तुम्ही इंग्रजी भाषेत पक्के झाले असे समजा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा शब्दसंग्रह पक्का पाहिजे. प्रत्येक इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ काय होतो आणि मराठी शब्दाचा इंग्रजी भाषेत अर्थ काय होतो हे माहित असणे गरजेचे आहे.

त्यासाठी मराठी डिक्शनरी आणि इंग्रजी डिक्शनरी तुमच्या कडे असली पाहिजे. इंग्रजी शिकण्यासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी व्याकरणातील महत्त्वाचा कोण,कोणता भाग आहे हे माहित असणे, आवश्यक आहे. इंग्रजी व्याकरणातील महत्त्वाचा भाग किंवा विषय “काळ” (Tense) हा आहे. तसेच या डिजिटल भारतात इंग्रजी येणं गरजेचे आहे.असे प्रतिपादन श्री. प्रदिपजी ठाकरे यांनी केले.

स्थानिक विद्यार्थी-शिक्षक मित्र अभ्यास मंडळ तुमसर आणि माझी माय सरसोती समूह भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “HOW TO SPEAK ENGLISH EASILY” या विषयावर श्री.प्रदिपजी ठाकरे हे आभासी बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन प्रा.संजय लेनगुरे यांनी विद्यार्थ्यांच्या मनात असलेले इंग्रजी विषयाचे शंकांचे निराकरण करून देणे अत्यावश्यक असून याकरिताच विध्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे असे मत मांडले .

सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून श्री. पुणेश्वर बावणे, श्री. रमेश बोंद्रे. कु. दिव्या बोरकर, श्री. अमोल बोपचे यांनी स्थान भूषविले. सूत्रसंचालन कुणाल बांडेबुचे, अंजली गिरीपुंजे यांनी तर आभार प्रदर्शन शुभांगी किरपाणे, अमय भुरे यांनी केले. ऑनलाईन मार्गदर्शन सत्राला तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनश्री आकरे, स्वाती भोयर, पूनम टेकाम, सलोनी बोकडे, सोनाली लाडसे, त्रिवेणी पटले, रचिता पारधी, पायल पारधी, वैष्णवी अवथरे, आचल खेडकर, रक्षा रहांगडाले, राजश्री पटले, भुमिका तूरकणे, हिमांशी साठवणे, अनुजा सार्वे, सलोनी ठवकर, गायत्री गुरव, युगेश बारागौणे, हिमांशू महांकर तसेच विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here