Home महाराष्ट्र महिला सक्षमीकरणाचा जिवंत वस्तुपाठ देणाऱ्या शाहूंच्या स्मृती शताब्दी वर्षात महिलांची उपेक्षा –...

महिला सक्षमीकरणाचा जिवंत वस्तुपाठ देणाऱ्या शाहूंच्या स्मृती शताब्दी वर्षात महिलांची उपेक्षा – रंजना सानप

80

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.22मे):-महिला सक्षमीकरणाचा जिवंत वस्तू पाठ देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कायदे, नियम करून त्यांच्या उत्थानासाठी कार्य केले मात्र, त्यांचाच स्मृती शताब्दी वर्षाच्या उपक्रमात महिलांना कुठेही सहभागी करून घेतले नाही, अशी खंत जेष्ठ लेखिका आणि विचारवंत रंजना सानप यांनी व्यक्त केली. आम्ही भारतीय महिला मंच यांच्यावतीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांचा विचारांचा जागर करण्यासाठी आयोजित केलेल्या अभिवादन सभेत त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता गिरी ह्या होत्या.

ह्यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, जाती धर्माच्या पुढे जाऊन आज शाहूंचा लेकी कल्याणकारी वारसा जपण्याचे आणि ते संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर करण्याची नैतिक जबाबदारी महिलांची आहे. रखमाबाई केळवकर, कृष्णाबाई केळवकर, महाराणी इंदुमती बाईसाहेब ह्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी तर राजर्षी शाहूंनी प्रयत्न केलेच मात्र त्यासोबत महिला सक्षमीकरणाचा जिवंत वस्तूपाठ देणारे म्हणून राजर्षी शाहू हे ख्यातकीर्त आहेत हे विशेष.ह्यावेळी शिवाजी विद्यापीठ मधून इंग्रजीतून पीएच डी. पदवी मिळवणाऱ्या डॉ. शोभा चाळके-म्हमाने यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रा. मिनल राजहंस, योगिता कोडोलीकर, प्राचार्य सुचेता भोसले, पुनम राजहंस, वैशाली कांबळे, तृप्ती राजहंस, साक्षी चोथे, अमृता नलवडे, अनुष्का माने, राधिका पाटील, मनिषा मोरे आदी मान्यवर महिलसह कोल्हापूर जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक प्रा. मिनल राजहंस यांनी केले. सूत्रसंचालन सानिका नाकील यांनी तर आभार साक्षी चोथे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here