Home महाराष्ट्र कलाकारांनी आपल्या कलेतून मानवता जपावी : सिनेअभिनेते संजय मोहिते

कलाकारांनी आपल्या कलेतून मानवता जपावी : सिनेअभिनेते संजय मोहिते

169

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.21मे):; कलाकारांनी आपल्या कलेतून नेहमीच मानवता जपली पाहिजे. सामाजिक जाणीव ठेऊन परिश्रम घेणारा कलाकार कलेच्या क्षेत्रात नाव लौकिक मिळवतो. कोल्हापूर ही कलेची नगरी आहे. चित्रपट क्षेत्राला अनेक मोठे कलाकार कोल्हापूरने दिले आहेत. कलेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असली तरी मोठया प्रमाणात संध्याही उपलब्ध आहेत असे प्रतिपादन सिनेअभिनेते संजय मोहिते यांनी केले ते निर्मिती फिल्म क्लबच्या वतीने अभिनय, गायन, नृत्य आणि चित्रपट व नाटक निर्मितीची प्राथमिकता या विषयावर शनिवार दि. 21 मे 2022 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पार पडलेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते.

या कार्यशाळेत गायक विश्वास सुतार, कोल्हापूर, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, बाबू गावकर, मुंबई, मराठी अभिनेत्री डॉ. राजश्री खटावकर, कोल्हापूर, मराठी अभिनेत्री अमिता धिवार, पुणे, निर्माते अनिल म्हमाने, कोल्हापूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कलाकार, निर्माते व तज्ज्ञ मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत चित्रपट व नाटक निर्मिती प्राथमिकता, अभिनय, गायन व नृत्याची प्राथमिकता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत आयोजक चंद्रनील सावंत, साक्षी चोथे यांच्यासह डॉ. कपिल राजहंस, डॉ. शोभा चाळके, ऍड. करुणा विमल, मोहन मिणचेकर, सानिका नाकील, चंद्रकांत मधाळे, राहुल राजहंस, स्वरूपा बिलावर, संकेत भोसले, धनश्री नाझरे, अनुष्का माने, आदित्य बल्लाळ, राधिका पाटील, विश्ववेदा सावंत, अनिलकुमार बांगर, रुतेश पटेल, सनी येळावकर, किशोर कांबळे, पूजा चांदणे यांच्यासह मोठ्या संख्येने कलाकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here