




✒️संजय बागडे(नागभीड,तालुका प्रतिनिधी)मो:-9689865954
नागभीड(दि.21मे):-नागभीड येथे आनंद बुद्ध विहार येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची सभा पार पडली. या समितीला मार्गदर्शक म्हणुन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य सदस्य रामभाऊ डोंगरे हे उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या उपस्थित समीती गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष हरिभाऊ गरपडे, उपाध्यक्ष खापर्डे, कार्याध्यक्ष अमृत शेंडे, प्रधान सचिव अरुण पेंदाम,विविध उपक्रम कार्यवाह आनंद मेश्राम(पत्रकार),
वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह शेषराव लोणारे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह रोशन सोनूले, सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह कमलाबाई खोब्रागडे, महिला सहभाग कार्यवाह- जसवंदा रामटेके,निधी संकलन कार्यवाह ज्योती खोब्रागडे, सोशल मीडिया कार्यवाह- सुरेश कोसे,
वार्तापत्र विभाग कार्यवाह आर.डी. रामटेके, जातीअंत संकल्प विभाग कार्यवाह शिल्पा शेंडे यांचा समावेश आहे.




