Home चंद्रपूर मा. आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचा पुढाकारातून जि.प नकोडा-मारडा क्षेत्रातील गावात रस्ताबांधकाम होईल पूर्ण

मा. आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचा पुढाकारातून जि.प नकोडा-मारडा क्षेत्रातील गावात रस्ताबांधकाम होईल पूर्ण

92

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.21मे):-दि. १९. मे चंद्रपूर तालुक्यातील जिप नकोडा-मारडा क्षेत्रातील शेणगाव, उसगाव, वढा, पांढरकवडा, धानोरा, पिपरी, मारडा या गावातील रस्ता रुंदीकरण मजबुतीकरणासह डांबरीकरन करण्यास मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचा पुढाकारातून वर्ष २०२२ या वित्तीय वर्षात रस्ता बांधकामाच्या तरतुदीस मान्यता मिळाली असून लवकरच कार्य सुरु होणार असल्याची माहिती माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे याना सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता यांनी कार्यालयीन भेटी दरम्यान दिली. २०२१-२०२२ या वर्षातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील ताडाळी येरूर पांढरकवडा धानोरा भोयगाव गडचांदूर जिवती रस्ता ३७३ किमी १०/८०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे आहे.

तसेच चंद्रपुर तालुक्यातील शेणगाव उसेगाव वढा धानोरा पिपरी मारडा रस्ता रुंदीकरण मजबूतीकरण डांबरीकरण प्रजीमा १२ किमी १६/५०० ते २५/२००, ५/८०० ते ९/०० व २/०० ते ५/८०० रस्ता बांधकामाकरिता अंदाजित ३.३३ लक्ष रुपयाची एकंदरीत तरतूद करण्यात आली आहे. सदर रस्ता बांधकामामुळे गावातील नागरिकांना वाहतुकीसाठी सोयीस्कर होईल. तसेच गावातील व्यवसायात देखील प्रगती होईल. सदर बांधकाम मंजूर झाले असून लवकरच ते पूर्ण होणार आहे. ह्यासाठी गावातील नागरिक सुभाष पिंपळशेंडे, नारायण अडबायले, बंटी भोस्कर, कमलाकर येडमे, गुलाराम धांडे, विजय आगरे, विनोद खेवले यांनी मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here