Home महाराष्ट्र धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ अभियान

धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ अभियान

129

🔹दर रविवारी विविध वॉर्डातील जनतेशी साधणार संवाद, राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणी अभियान देखील राबविले जाणार

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.21मे): – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळी शहरात रविवारपासून (दि. 22) ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ या अभियानास सुरुवात करण्यात येत असून, याअंतर्गत धनंजय मुंडे हे पदाधिकाऱ्यांसह परळी शहरातील प्रत्येक वार्डात जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

रविवारी (दि. 22) सकाळी 7 वा. शहरातील वॉर्ड क्र. 1 (बरकत नगर) भागातून या अभियानास सुरुवात करण्यात येईल. यावेळी धनंजय मुंडे हे स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य नोंदणी अभियान देखील राबविण्यात येणार आहे.

परळी शहरातील नागरिकांनी माझ्या राजकीय जडणघडणीत मोलाचे सहकार्य केलेले आहे. विधानसभा निवडणुकीत मला तब्बल 20 हजारांचे मताधिक्य शहराने दिलेले आहे. कोविड काळात आम्ही लोकांची सेवाधर्म च्या माध्यमातून सेवा केली, मात्र निर्बंधांमुळे संवाद काही प्रमाणात कमी झाला होता, त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून परळी शहरातील नागरिकांशी आपले नाते अधिक घट्ट करण्याचे उद्दिष्ट या अभियानामागे असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान उद्या (रविवार) सकाळी 7 वा. वॉर्ड क्रमांक एक मधील बरकत नगर भागातून या अभियानास सुरुवात होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी आदींनी या उपक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहरच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here