Home महाराष्ट्र आपल्या तोंडचा घास हिरावून घेत असताना सुद्धा पक्षनिष्ठा एवढी काही कामाची नाही:...

आपल्या तोंडचा घास हिरावून घेत असताना सुद्धा पक्षनिष्ठा एवढी काही कामाची नाही: प्रभाकर भैया देशमुख

93

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.20मे):-सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण म्हणजे आपल्या जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्यांचे भाकरी आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी उजनी धरणाचे दोन टीएमसी पाणी परत इंदापूरला पळविण्याचा घाट घातला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस भाजपच्या आमदारांनी खासदारांना डोळे असून आंधळे व का नसून बहिणीचे भूमिका न घेता दोन टीएमसी पाणी रद्द करा अन्यथा राजीनामा द्या अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले की गेल्या वर्षी पण जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गतवर्षी उजनीचे पाणी पळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु जनहित शेतकरी संघटनेने सह इतर संघटनेने आंदोलन करून तो प्रयत्न हाणून पाडला होता. दोन टीएमसी पाणी नेण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचा प्रखर विरोध आहे. प्रसंगी रक्त सांडू परंतु एक थेंबही पाणी इंदापूरला नेऊ देणार नाही. असं नाही झालं तर..

पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील 35 गावची योजना मोहोळ तालुक्यातील सीना जोड कालवा पोखरापूर तलावात पाणी सोडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुपुत्र कॅबिनेटने आदित्य ठाकरे यांनी पडलेल्या नारायण यांचे आत्मपरीक्षण केले त्यांनी केले पाहिजे तसेच इतर सिंचन योजना रखडत पडलेले आहेत त्यांना खडकवासला पुणे जिल्ह्यातील इतर 17 धरणाची पाणी नियमावली मंजूर असलेले त्यांनी द्यावी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनीही सोलापूर जिल्ह्याचे तमाम जनतेने शेतकरी ताकद दिली होती. या जिल्ह्यामध्ये आमदाराच्या व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांची सुद्धा जमिनी आहेत त्यांना सुद्धा या घटनेचे गांभीर्य पाहिजे तुम्ही पक्षाचे नेते दावणीचे बैल होऊ नका. अन्यथा आपल्या सर्वांच्या प्रपंच उध्वस्त होणार असल्याचे यावेळी प्रभाकर भैया देशमुख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here