




✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)
कारंजा(घा)(दि.20मे):-ग्रामसंत लटारे महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्य राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी कारंजा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा निलेश ऍग्रो एजन्सी चे संचालक निलेश भुयार यांच्या निवासस्थानी भेट दिली .दिनांक 18/5/2022 ला कारंजा येथे संत लटारे महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्य सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.कारंजा नगरीत आगमन झाल्यानंतर निलेश भुयार यांच्या दादाशिवरपन्न या निवासस्थानी सत्यपाल महाराजांनी भेट दिली.
यावेळी संभाजी ब्रिगेड शाखा कारंजा व शालवन बहुउद्देशीय संस्थे तर्फे सत्यपाल महाराज यांचे पुस्तक व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले यातून सामाजिक वणीकरनाचा संदेश देण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश पाचपोहर ,संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर ,बहुजनांचे नेते विनोद पाटील ,सोहन टूले ,विजय कांबळे ,माधुरी जसुतकर,श्रद्धा भुयार ,संगीता पाटील व भुयार कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती.




