




🔹सहेली महिला मंचचा पुढाकार
✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)
कारंजा(घा)(दि.20मे):-कारंजा येथे कारंजा नगरी चे ग्रामदैवत संत लटारे महाराज यांच्या पुण्यतिथी मोहत्सवा निमित्य योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 15 मे पासून संत लटारे महाराज यांच्या पुण्यतिथी मोहत्सवाला सुरवात होणार असून दिनांक 21 मे ला पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे .सहेली महिला मंच तर्फे या योगा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे .
दिनांक 15 मे पासून ते 21 मे पर्यंत रोज सकाळी 5 वाजता कारंजा येथील कस्तुरबा शाळेच्या प्रांगणात योगा शिबिराला सुरवात करण्यात येईल .या शिबिरामध्ये सर्व वयोगटाचे नागरिक सहभागी होऊ शकते व जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी या शिबिरा चा लाभ घ्यावा असे आव्हान सहेली महिला मंच च्या सर्वेसर्वा माधुरी जसुतकर व योगा प्रशिक्षक भारती पालिवाल ,संगीता उपाध्ये ,रजनी धांदे यांनी केले आहे.योगा शिबिर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहेली योगदान देत आहे.




