Home महाराष्ट्र अखिल महाराष्ट्र कामगार संघटना बीड जिल्हा अध्यक्ष पदी शेख रसूल यांची निवड

अखिल महाराष्ट्र कामगार संघटना बीड जिल्हा अध्यक्ष पदी शेख रसूल यांची निवड

97

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.19मे):-आखील महाराष्ट्र कामगार संघटना ही राज्यभरात काम करत असुन या संघटनेच्या वरिष्ठांनी आखील महाराष्ट्र कामगार संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी शेख रसुल यांची निवड केली असुन या निवडी संदर्भात आपले मनोगत व्येक्त करतांना शेख रसुल यांनी सांगितले की आखील महाराष्ट्र बांधकाम कामगारांसाठी शासनाने कामगारस्तरावर महाराष्ट्र बांधकाम ही योजना शासनाने सुरू केलेली आहे.

या योजनेत कामगारांना खूप सुविधा उपलब्ध आहे परतू कामगारा पर्यंत त्या पोहचत नाहीत या मध्ये कामगारांना स्वतः च्या लग्नासाठी 30000 रुपये, योजना, मुलीच्या लग्नासाठी 51000 रुपये, अटल घरकुल योजना, कामगारांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप योजना, मोफत जेवणाची योजना अश्या बर्‍याच योजना कामगारांसाठी उपलब्ध आसतांना ह्या व आस्या आणेक योजनेचा लाभ कामगारा पर्यंत पोहचत नाही त्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा या साठी अखिल महाराष्ट्र कामगार संघटना कार्यरत असुन या कामगार संघटनेचा बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात अली असुन कामगारा पर्यंत प्रतेक योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी मी सातत्याने कार्यरत (सक्रिय) राहणार असुन बीड जिल्ह्या मध्ये म्हणाव्या तेवड्या कामगारांच्या नोंदी शासन व प्रशासनस्तरावर दिसुन येत नसून जास्तीत जास्त बांधकाम कामगार बांधवांनी नोंदणी करून घ्यावी कामगारांना कुठलीही समस्या असेल तर माझ्या या मोबाइल क्रमांकावर 9623030808 संपर्क करु शकतात असे आव्हान अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचे नवनिर्वाचित बीड जिल्हा अध्यक्ष शेख रसुल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here