Home धार्मिक  महानगर भाजप च्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध भिक्षु यांना चिवर वस्त्र दान

महानगर भाजप च्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध भिक्षु यांना चिवर वस्त्र दान

138

🔸बुद्ध पौर्णिमेला महानगर भाजपाचा उपक्रम

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.19मे):-बुद्ध पौर्णिमेच्या औचित्यावर दि 16 मे रोजी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील महाविहारात श्रद्धेय भदंत सुमनवन्न महास्थवीर यांच्या उपस्थितीत श्रद्धेय भदंत सुमंनवन्नो महास्थवीर, भदंत संघवंशजी, भदंत धम्मप्रकाश संबोधी, भदंत रत्नमणीजी, श्रमण पदमवन्नो या पाच बौद्ध भिक्षूंना आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून भाजपा महानगर चंद्रपुर च्या वतीने चिवर वस्त्र दान करण्यात आले.

भगवान बुद्धांची शिकवण समस्त मानवजातीला अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने तर असत्याला सत्याने जिंकता येते. अशी शिकवण तथागताने दिली. हि शिकवण समस्त मानवजातीला तारणारी आहे. हि शिकवण अंगीकारा असे प्रतिपादन महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.

ब्रिजभूषण पाझारे यांनी उपस्थित बौद्ध भिक्षूं यांचा सह तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला अभिवादनकरून सामुहिक बुद्ध वंदना केली.यावेळी उपास्थीत मान्यवर भाजपा महानगर अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक सुभाष कासमगोट्टूवार, भाजप महामंत्री अनु. जाती राजेश थूल, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, राजकुमार आक्कापेल्लिवार, खैरेजी, संतोष रामटेके, पिपरे साहेब, शिवा रायपुरे यांची उपस्थिती होती.0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here