Home महाराष्ट्र मोर्शी तालुक्यातील बारोल साठवन तलावाला मिळाली १६ कोटी ५० लक्ष रुपयांची सुधारित...

मोर्शी तालुक्यातील बारोल साठवन तलावाला मिळाली १६ कोटी ५० लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता !

255

🔹आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे ११८ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली !

🔸खानापूर, आष्टगाव, विरुळ, अंबाडा गावातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.19मे):-वरुड तालुक्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी देवून सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी संत्रा पिकाची लागवड मोठया प्रमाणावर असल्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार प्रयत्न करतांना दिसत आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यतील विविध क्षेत्रात जलसंधारण उपाययोजना करून सिंचन क्षेत्र वाढविण्यासंदर्भात मृद व जलसंधारनाच्या कामांकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री दत्ता मामा भरणे, आमदार देवेंद्र भुयार, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक संपन्न झाली होती. मृद व जलसंधारण मंत्री दत्ता भरणे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणी ची दखल घेऊन मोर्शी मतदारसंघातील भूजल पातळी वाढविण्या करिता उपाययोजना करण्यासाठी मोर्शी तालुक्यातील बारोळ साठवण तलाव पूर्णत्वास नेण्याकरिता १६ कोटी ५० लक्ष ६२ हजार ५३१ रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे मोर्शी तालुक्यातील बरोल साठवण तलावाची साठवन क्षमता ७८५ सघमी असून ११८ हेक्टर सिंचन क्षमतेच्या साठवन तलावाचे अपूर्ण असलेले काम व त्याद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्याची योजना कार्यान्वित करण्याकरिता या प्रकल्पाचे ऊर्वरीत कामे पूर्ण करण्याकरिता, बरोल प्रकल्पाचे भुसंपादनापैकी निधी वाटप यासह इत्यादी कामे समाविष्ट करण्याकरिता बरोल साठवन तलावाच्या अंदाज पत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता ११ एप्रिल रोजी १६ कोटी ५० लक्ष ६२ हजार ५३१ रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून मोर्शी तालुक्यातील बारोळ साठवन तलावाचे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असून बारोळ तलावाच्या लाभक्षेत्रातील खानापूर, आष्टगाव, विरुळ, अंबाडा येथील शेतकऱ्यांचे ११८ हेक्टर क्षेत्र शेतजमिन सिंचनाखाली येणार असून शेकडो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.

मोर्शी वरुड तालुक्यातील अनेक अपुर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून सुधारित प्रशकीय मान्यता प्रदान करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली असून बारोळ साठवन तलाव पूर्णत्वास नेण्याकरिता १६ कोटी ५० लक्ष ६२ हजार रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून मोर्शी वरुड तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन मतदार संघ ड्राय झोनपासून मुक्त व्हावा शेती सिंचनामुळे आर्थिक संपन्नता यावी तरुण शेतकऱ्यांना वैभवशाली दिवस त्याच्या आयुष्यात निर्माण व्हावे याकरीता मतदार संघातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील आहे — आमदार देवेंद्र भुयार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here