Home महाराष्ट्र सेंट थॉमस चर्च येथे हायमास्ट लाईट लावा

सेंट थॉमस चर्च येथे हायमास्ट लाईट लावा

299

🔹ख्रिश्चन बांधवांसह भाजपाची मागणी

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.18मे):-येथील सेंट थॉमस चर्च येथे हायमास्ट लाईट लावण्याची मागणी ख्रिश्चन बांधवांसह भाजपातर्फे करण्यात आली आहे.ख्रिश्चन बांधवांनी भाजपा शिष्टमंडळा सोबत मुख्याधिकारी अर्शीया जुही यांची भेट घेतली व चर्चा करून मागणीचे निवेदन दिले.घुग्घुस येथील वार्ड क्र. सहा मधील सेंट थॉमस चर्च हा सर्वात मोठा चर्च आहे. येथे सातही दिवस ख्रिश्चन बांधव प्रभुची आराधना करतात. संध्याकाळी सुद्धा प्रार्थना केली जाते.

रात्री लाईटची व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे चर्च परिसरात अंधार पडतो, याचा ख्रिश्चन बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याठिकाणी हायमास्ट लाईट लावण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, ट्रेझरर जेम्स मंत्री, माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, पास्ट्रेड कमिटी सदस्य विनोद लाटेलवार, स्वामीदास कलवल, चर्च सदस्य सिद्दु मीठ्ठा, टोनी तांड्रा, शाम आगदारी, हेमंत पाझारे, लाटेलवार व ख्रिश्चन बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here