Home महाराष्ट्र विज्ञाननिष्ठ बूध्द धम्म जगाची गरज- गमतीदास फुलझेले

विज्ञाननिष्ठ बूध्द धम्म जगाची गरज- गमतीदास फुलझेले

189

🔹पंचशिल बुध्द विहार गोंडपिपरीत बुध्द जंयती

✒️नितीन रामटेके(विशेष प्रतिनिधी)

गोंडपिपरी(दि.18मे):-तथागतांनी बुध्द धम्माची स्थापना केली.त्यांनी सांगितलेल्या विचारांनी मानवजातीचे कल्याण झाले. सम्राट अशोकांनी संपुर्ण आशिया खंडात धम्माचा प्रसार केला.बुध्द धम्म विज्ञानावर आधारीत आहे. जसा विज्ञानाचा विकास होत आहे.तशी बुध्द धम्माची व्याप्ती वाढत आहे. तथागताचा मानवी कल्याणाच्या विचार हा जगाची गरज बनला आहे यातुनच अनेक राष्ट्र तथागताच्या धम्माचा अवलंब करित आहेत. असे मत सामाजिक कार्यकर्ता गमतीदास फुलझेले यांनी व्यक्त केले.पंचशिल बुध्द विहारात बुध्द जयंती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.चंद्रपूरचे भंते आर्यसुत्त थेरो अध्यक्षस्थानी होते.भारत झाडे,हनुमंतू झाडे,विशाखा फुलझेले,कल्याणी दुर्गे,राकेश बांबोळे अदि मान्यवर यावेळी उपस्थीत होते.

सकाळी पंचशील बुध्द विहारात सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली.यानंतर नगरात धम्मध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले.
सायंकाळी मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलतांना भंते आर्यसुत्त थेरो यांनी बुध्द धम्माचे महत्व व आचरण प्रणाली समजावून सांगितली.राकेश बांबोळे यांनी जातीअंतासाठी बौध्दराष्ट्रवाद या विषयावर आपले मत मांडले.याप्रसंगी उपस्थीत मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.बुध्द जयंतीच्या निमीत्ताने तोषवीनाथ झाडे यांनी खिरदान तर भारत झाडे,हनुमंतू झाडे,मोरेश्वर दुर्गे,झावरू उराडे यांच्याकडून भोजनदान देण्यात आले.रात्री नितेश डोंगरे,प्रविण भसारकर,रूपेश निमसरकार,माया रामटेके,शैलेश झाडे यांनी प्रबोधनात्मक संगीताचा कार्यक्रम सादर केला.कार्यक्रमाचे संचालन आलोक खोब्रागडे तर आभार रूपेश निमसरकार यांनी मानले.कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौध्द महासभा गोंडपिपरी च्या वतीन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here