Home महाराष्ट्र मराठ्यांना ब्राम्हणांनी दाखवून दिली जात व लायकी!

मराठ्यांना ब्राम्हणांनी दाखवून दिली जात व लायकी!

347

एक मराठा लाख मराठा या घोषणेनंतर राज्यात प्रचंड वैचारिक प्रबोधन होईल आणि खोटा इतिहास लिहणाऱ्याचा भूगोल केला जाईल अशी अपेक्षा होती.आरक्षण मागत असतांना आरक्षण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या संस्थान मधील प्रशासकीय कामकाजाच्या कारकीर्दीचा अभ्यास मराठा तरुण कार्यकर्ता नेता करेल आणि तो समाजात जाऊन वैचारिक प्रबोधन करेल त्यामुळे समाजात “एक मराठा लाख मराठा” ब्राम्हणाची धर्मसत्ता शिक्षणसत्ता आणि राजसत्ता उलथून टाकेल ही अपेक्षा ठेऊन आम्ही सत्यशोधक आंबेडकरी चळवळीचे लोक अशी स्वप्न पाहत होतो. ब्राम्हणांना मात्र तशी कोणतीच भीती कधीच वाटत किंवा वाटली नाही. उलट त्यांनी मराठ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन ओबीसी धनगर, इतर मागासवर्गीय जातीचे शिक्षण, नोकरीतील आरक्षणा सोबत राजकीय आरक्षण कसे न्यायालयाद्वारे संपविले कोणालाच कळले सुद्धा नाही. तरी मराठ्यांना क्षेत्रिय सुवर्ण असण्याचा गर्व कायम आहे.ओबीसी मागासवर्गीय जातीच्या लोकांना शूद्रातिशूद्र मध्ये गणल्या जाते त्यामुळे वेळोवेळी त्यांना मंदिर प्रवेशाच्या वेळी अपमान सहन करावा लागतो. त्यावेळी त्याविरोधात तो संघर्ष करतो त्याला आता त्याची सवय झाली आहे.पण मराठा समाजाला अपमानास्पद वागणूक सहन करण्याची सवय नाही. तो त्याविरोधात संघर्ष सुद्धा करीत नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहूमहाराज यांचे वारसदार खासदार ते ही भाजपाचे असतांना कुलस्वामीनी तुळजापूर मंदिरातील गाभार्‍यात जाण्यापासून संभाजीराजेंना रोखण्याचा प्रकार ब्राम्हणांनी पुजाऱ्यांनी कोणत्या धडासांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील सत्यशोधक आंबेडकरी चळवळीशी संबधित बहुजन समाज संताप व्यक्त करीत आहे. बाकी गर्वसे कहो म्हणणारे मराठा ओबीसी अजूनही गप्प आहेत. मराठा समाजाचा अपमान करण्याचा आजचाच प्रयत्न हा पहिला नाही. तर इतिहासात वाचण्याची तसदी घेतली तर असे प्रकार अनेकदा नव्हे तर वारंवार झाल्याची नोंद इतिहासात दिसेल.त्याचीच री आता ओढली असून पुन्हा एकदा ब्राम्हणांनी मराठ्यांना शुद्रच ठरवले असल्याचे संभाजीराजेंच्या झालेल्या अपमानावरून दिसून येत आहे.त्यांचा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सोबत असणारे कार्यकर्ते,नेते पत्रकार, साहित्यिक विचारवंत निषेध करतांना दिसतात. पण राज ठाकरेची हागण्या मुतण्याची सतत बातमी देणारे वृत्तवाहिन्या, प्रिंट मिडिया संभाजीराजे यांचा शुद्र म्हणून कुलस्वामीनी तुळजापूर मंदिरातील गाभार्‍यात जाण्यापासून रोखण्याच्या ब्राम्हणांनी केलेल्या धडासाची बातमी फारशी होतांना दिसत नाही.म्हणजे चॅनल प्रिंट मिडिया मधील जात भाई योग्य वेळी कसे आपल्या ब्राम्हण जातीच्या लोकांचे रक्षण करतात हे मराठा, ओबीसी पत्रकार संपादक,मालकांनी लक्षात घेण्यासारखे आहे.
कुलस्वामीनी तुळजापूर मंदिरातील गाभार्‍यात जाण्यापासून संभाजीराजेंना रोखण्याचा प्रकार ब्राम्हणांनी केल्याची बातमी जास्तीत जास्त मराठा ओबीसी समाजात जाणे आवशक्यता असतांना ती ती थांबवली जाते.

तीच बातमी जर घरा घरात गेल्यास मंदिरात जाणाऱ्या मराठा, ओबीसी संख्या कमी होऊन ब्राम्हणाची रोजगार हमी बंद होऊ शकते.कारण मंदिरात देव नाही दगडाची किंवा धातूची मूर्ती आहे. त्यावरच एकूण ब्राम्हण समाजाचे पोट आहे.हे महात्मा फुले प्रबोधनकार ठाकरे यांनी वेळोवेळी समाजाला सांगितले आहे.हा इतिहास वाचत नसल्यामुळे विशेष जनजागृती नाही.मंदिर हे ब्राम्हणांचे पोट भरण्याच्या धंद्याची जागा आहे.रोजगार हमी आहे.महात्मा फुलेंनी अनेक उदाहरणे देऊन सांगितले आहे.इतिहासाची पाने चाळताना आज केवळ संभाजीराजेंचाच अपमान झालेला नाही तर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचाही अपमान याच ब्राम्हणांनी केला होता.एका शुद्राला राजा होण्याचा अधिकार नाही असे सांगत ब्राम्हणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध केला होता.महाराष्ट्रातील ब्राम्हण राज्यभिषेक करण्यासाठी तयार नव्हते,म्हणून काशी वरून गागा भट्टला त्याच्या वजना एवढे होन देऊन बोलावण्यात आले. होते.त्याला लाच देताच तो राज्यभिषेकाला आला हा इतिहास आपण वाचत नाही.फक्त जय भवानी जय शिवाजी म्हणतो.

ब्राम्हणी धर्माने अपमान केला म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्यभिषेक शाक्त पद्धतीने केला,शाक्त पद्धत म्हणजे बुद्ध धम्मानुसार त्यांनी राज्यभिषेक केला. अफझलखान खानाचा खूप गाजावाजा केला जातो पण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अंगावर चालून आलेल्या कृष्णा भास्कर कुलकर्णीचे दोन कुलकर्णी केले हे कधीच सांगितल्या जात नाही.त्यावेळी महाराजांनी ठणकावून सांगितले की “ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा राखतो” असा इशारा दिला होता. हा देखील इतिहास आहे.भिडे गुरुजी,बो.मु.पुरंदरे त्याचा मानसपुत्र राज ठाकरे कधी मराठा ओबीसी तरुणांना सांगत नाही.तो आम्हालाच सांगावा आणि लिहावा लागेल.

एवढेच कशाला राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यावेळी तेथे जोशी नावाच्या ब्राम्हणाने छत्रपती शिवाजी महाराजांना कुणबट अशी शिवी दिली. एका कुणबटाची समाधी का शोधून काढली, तेथे फुले वाहायची काय गरज आहे? असा प्रतिप्रश्‍न केला होता. त्याच रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा ब्राम्हणांनी मराठा ओबीसी तरुणांना आकर्षित करण्याचा मुद्धा केला होता, आणि आज ही आहे.
जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला होता, तसाच अपमान राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचाही करण्यात आला. सखाराम परांजपे या ब्राम्हणाच्या वरातीतून फुले यांना शुद्र म्हणून बाहेर काढण्यात आले होते. हा अपमानाचा घोट पचवून त्यांनी सत्यशोधक चळवळ उभी करून ब्राम्हणांना सळो की पळो करून सोडले होते.आज संभाजीराजेंचा अपमान झाला असे समजतात एक मराठा लाख मराठा समाजाच्या तरुणांनी ब्राम्हणांना सळो की पळो करून सोडले पाहिजे होते.राज ठाकरेच्या हनुमान चालीसा भोंग्यासाठी ढवळून निघणारा महाराष्ट्र कुलस्वामीनी तुळजापूर मंदिरातील गाभार्‍यात जाण्यापासून संभाजीराजेंना रोखण्याच्या घटनेने कुठे ही जागरूक दिसला नाही.एक मराठा लाख मराठा चे नेतृत्व करणारे संभाजीराजे ज्यांच्या रक्ताचे वारसदार आहोत म्हणून सांगतात,त्या शाहू छत्रपती महाराजांचाही ब्राम्हणांनी वेदोक्त मंत्र नाकारून अपमान केला होता.संभाजी राजेंनी शाहू छत्रपती महाराजांचे विचार काय आहेत ते त्यांनी वाचले नसतील असे म्हणता येत नाही.तरी ते त्यांनी वाचून एक मराठा लाख मराठा तरुणांना मोठ्या प्रमाणात उपलब्द करून दिले पाहिजे.त्यातूनच मोठी वैचारिक जनजागृती होईल. मराठा सेवा संघांनी ज्या पद्धतीने वैचारिक जनजागृती केली त्याच पद्धतीने एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी करणाऱ्यांनी जनजागृती करणे आवश्यक आहे.

इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो.म्हणूनच १५ एप्रिल,१९२० मध्ये नाशिक येथील भाषणात शाहू छत्रपती महाराज म्हणाले होतेे की,मराठा,ओबीसी बहुजन समाजाने ब्राम्हणांकडून पूजा करविणे व त्यांच्या हाताने धर्मकृत्ये चालविणे सोडले पाहिजे.धर्मग्रंथ किंवा कथा पुराणे ऐकणे बंद केले पाहिजे.नाहीतर ब्राम्हणांच्या श्रेष्ठपणाच्या कथाच आमच्या लोकांच्या कानावर येत राहतील. ब्राम्हणांना सोडून आमचीच कामे आम्हीच चालवावीत असे माझे ठाम मत आहे. ब्राम्हणांची रिलीजिअस ब्युरोक्रसी तुटून पडल्या शिवाय देशाचा उद्धारच होऊ शकणार नाही. ब्राम्हण पुजारी व ब्राम्हणांकडून धर्म ऐकण्याचे सोडणे यातच मराठा ओबीसी बहुजन समाजाचे भले आहे.एवढे स्पष्ट शब्दात शाहू छत्रपती महाराजांनी सांगितले असताना त्यांचेच वारसदार असलेले संभाजीराजे आर एस एस प्रणित ब्राम्हणांच्या भाजपाच्या गळाला लागले आहेत.आणि योग्य वेळी त्यांना मराठ्यांना ब्राम्हणांनी जात व लायकी दाखवून दिली.जे एका राष्ट्रपती सोबत होते तेच एका जेष्ठ राज्यसभेच्या खासदारा सोबत होते.त्यातूनच त्यांना मराठा ओबीसी बहुजन समाजाला जो संदेश देण्याचा असतो तो या पद्धतीने देतात.

आपल्याच महापुरूषांनी दिलेल्या विचारांचा बोध न घेता ब्राम्हणांच्या पाया पडणे हे गुलागगिरीचे लक्षण आहे. ते लक्षण असल्यानेच संभाजीराजेंचा अपमान करण्यापर्यंत ब्राम्हणांची मजल गेली.त्यांची खरी धर्मसत्ता राजसत्ता आहे त्यांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखविले.कधी गणपती दुध पितो,कधी रडतो,कधी नवेद दाखविला म्हणून बाटतो.पुण्यातील एका खोले बाईने यादव नावाच्या मराठा बाईने आमचा देव बाटवला, तुमचा आणि आमचा देव वेगळा असे सांगत सोवळे नासवले अशी आरोळी ठोकली होती. त्यावेळी ही फारस वादळ उठले नव्हते. मराठा ओबीसी समाजाच्या धडावर डोके आहे पण डोक्यातील मेंदू हा ब्राम्हणांच्या नियंत्रणा खाली आहे हे अ.ह साळुंखे,मा.म देशमुख यांनी अनेक पुस्तके लिहून सांगितले आहे. ते वाचून अज्ञान अंधश्रद्धा शंभर टक्के मुक्त होऊ शकतात.ते न वाचता त्यापासून धडा न घेणे म्हणजे एकप्रकारे गुलामी मान्य करणे असल्या सारखे आहे.याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार फारच महत्वाचे आहे. जो व्यक्ती आपला इतिहास विसरतो त्याला इतिहास कधीच माफ करत नाही.

एक मराठा लाख मराठा समाजा समोर एक मोठे आव्हान आहे.संभाजीराजे रक्ताचे वारसदार की विचारांचे हे त्यांना दाखवून द्यावे लागेल.एका मराठ्याचा अपमान दुर्लक्षित होऊ शकतो.मात्र संभाजीराजांचा केलेला अपमान म्हणजे एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या एकूण मराठ्याचा अपमान आहेच आणि पुन्हा एकदा मराठे शुद्रच आहेत. शुद्राने ब्राम्हणांची सेवाच करायची असे दाखवून त्यांनी अप्रत्यक्ष मनुस्मृतीचे समर्थन केले आहे. अशा या मनुवादी वृत्तीचा सत्यशोधक आंबेडकरी विचारांचा स्तंभ लेखक म्हणून मी जाहीर निषेध करतो.मराठ्यांना ब्राम्हणांनी जात व लायकी दाखवून दिली.आता मराठा समाजाने आपली संघ शक्ती दाखवून ब्राम्हणाची रोजगार हमी शंभर टक्के बंद पडण्याची सुवर्ण संधी आहे.म्हणूनच महात्मा फुले शाहूमहाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय संदेश दिला तो वाचा.वाचाल तर वाचाल.

✒️सागर रामभाऊ तायडे,भांडूप,मुंबई(अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य)मो:-९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here