Home महाराष्ट्र श्रद्धांजली निमित्ताने प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन

श्रद्धांजली निमित्ताने प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन

204

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18मे):-पिंपळगाव भोसले येथील प्रतिष्ठीत कलावंत मा. शामराव पिलेवान यांचे वृद्धापकाळात अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला .आदरांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने “बहुजनांची वर्तमान संकटकालीन स्थिती, वर्तमान आणि भविष्य ” या विषयावर वैचारिक प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले .प्रा. संजय मगर ज्येष्ठ विचारवंत , ब्रम्हपुरी यांचे अध्यक्ष्यतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रा. चंदन नगराळे , मार्कंड बावणे हे प्रमुख अतिथी होते . रोशनकुमार पिलेवान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला.

वक्त्यांनी बहुजनांची वर्तमान स्थिती या विषयी मार्गदर्शन केले . ” बहुजन समाज निद्रिस्त अवस्थेतून केव्हा जागा होणार ? ” असा पोटतिडकीचा सवाल करत प्रा. संजय मगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . कांताबाई पिलेवान , राकेश पिलेवान , अस्मिता पिलेवान , प्रा. अश्विनी पिलेवान , निताराम माटे , लंकेश जनबंधू यांचेसह शोकाकूल पिलेवान परीवार आप्तेष्ट तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सुप्रसिद्ध गायक सुरेश बनकर यांच्या भीमगीत गायनाच्या कार्यक्रमाचाही उपस्थितांना आस्वाद घेता आला . तबला संगत राकेश पिलेवान ,हार्मोनियम केशव लुलेकार , मुनीम बोदेले , हेमंत खोब्रागडे , जीवन सहारे , यांनी साथ संगत केली . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जयपाल मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन श्री. लोनारे यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here