Home महाराष्ट्र कातेवाडी नगरीत अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर पारायण सोहळा सात दिवस असलेल्या काल्याचे...

कातेवाडी नगरीत अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर पारायण सोहळा सात दिवस असलेल्या काल्याचे कीर्तनाने संपन्न: ह.भ.प. श्रीमंत सोलंकर

49

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.17मे):- कातेवाडी ता. मोहोळ सालाबाद प्रमाणे याहीवर्षी ह-भ-प बंकट स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वर पारायण सोहळा दिनांक 10/05/22 रोजी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ज्ञानेश्वर माऊली ग्रंथांचे पूजन करून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये पहाटे 5 वाजता काकडा 9ते 11 प्रवचन सायंकाळी 5 वाजता हरिपाठ 7 ते 8 प्रवचन 9 ते 11 किर्तन व महाप्रसाद तो रात्रभर हरिजागर अखंड हरिनाम सप्ताह चे स्वरूप होतं.

या अखंड हरिनाम सप्ताह हनुमान भजनी मंडळ कातेवाडी, औढी, नांदगाव, कोढी, वरवडे गोटेवाडी, आणि ढोक बाभुळगाव यांची साथ संगत लाभली. या सप्ताहाची सांगता काल्याचे किर्तन करण्यात आली काल्याचे किर्तन ह .भ .प. श्रीमंत सोलंकर महाराज या सत्याला मोलाची साथ संगत हनुमान वहिनी मंडळ औंढी, कातेवाडी ,वरवडे, यांची लाभली. काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करून अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. या अखंड हरिनाम सप्ताह आला विशाल मासाळ परमेश्वर मासाळ व मासाळ परिवाराचे योगदान लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here