Home महाराष्ट्र गौतम बुद्धाचा धम्म हा समुद्रातील निळ्याशार पाण्यासारखा आहे; संशोधक भास्कर दवणे

गौतम बुद्धाचा धम्म हा समुद्रातील निळ्याशार पाण्यासारखा आहे; संशोधक भास्कर दवणे

107

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव प्रतिनिधी)

हादगाव(दि.17मे):-तालुक्यातील हरडफ येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध विहार व वाचनालय भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन उपा. आर व्ही वाठोरे व उपा. गणपत वाठोरे व बुद्ध विहाराचे भूमिपूजन पूज्य भंते कीर्ती बोधी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संशोधक डॉक्टर भास्कर दवणे अनिताताई इंगोले ज्ञानोबा वाठोरे रेखा पाटील चव्हाण सिद्धार्थ पुंडे दौलत वायवळ सुनील भाऊ सोनुले देवानंद पाईकराव हे होते.तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व सामूहिक त्रिसरण पंचशील घेण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे संशोधक डॉक्टर भास्कर दवणे यांनी आपल्या व्याख्यानातून गौतम बुद्धाचा धम्म हा निळ्याशार पाण्यासारखा आहे जगाच्या कल्याणाचा मार्ग असून त्याची शिकवण आत्मसात केल्यास सर्वांचे कल्याण होईल एकीकडे स्वतःला बौद्ध म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे मात्र कंदर-या नवस करायचे बौद्धधर्म हा विज्ञानवादी आहे बुद्ध धम्म गडूळ करण्याचे काम आपलेच काही बांधव करत असल्याची खंत डॉक्टर दवणे यांनी व्यक्त केली आहे.तसेच डॉक्टर रेखा चव्हाण यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध हेच जगाच्या पाठीवर दःख मुक्तीचा एकमेव मार्गदाता आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भगवान बुद्धाचा मार्ग दिला त्या मार्गाने आज सर्व समाज चालतो आहे, प्रगती करत आहे.असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वाठोरे व गौतम वाठोरे यांनी केले केले, तर आभार प्रदर्शन भारत वाठोरे कृषी अधिकारी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्म ज्योती बुद्ध विहार कमिटी व नव युवक मित्र मंडळ महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. भास्कर दवणे संशोधक नांदेड रेखाताई चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र महिला काँग्रेस देवानंद पाईकराव तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सभापती नांदेड सिद्धार्थ उद्योजक औरंगाबाद दौलत वायवळ सैनिक लहान ॲड. भीमराव सोनाळे वंदना वाठोरे सरपंच कनकापूरे ग्रामसेवक साहेब आकांक्षा वायवळ महेंद्र नरवाडे दीपक सोनाळे शंकर वाठोरे अशोक वाठोरे पंजाबराव पाटील हारडफकर बालाजी सूर्यवंशी मारोतराव सुर्यवंशी अमित कांबळे भास्कर सूर्यवंशी गजानन सूर्यवंशी बालाजी कदम गोपीनाथ सूर्यवंशी माधव कदम तानाजी सूर्यवंशी नंदकुमार वारकड रविकुमार सूर्यवंशी प्रल्हाद पाटील हडसणीकर साईनाथ पाटील मंगेश पाटील शिवाजीराव जाधव वैजनाथ पाटील वानखेडे यासह मोठ्या प्रमाणामध्ये महिला पुरुषांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here