Home महाराष्ट्र हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या नवऱ्यासह सासऱ्याला गेवराई पोलीसांनी ठोकल्या बेड्या….!

हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या नवऱ्यासह सासऱ्याला गेवराई पोलीसांनी ठोकल्या बेड्या….!

257

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.17मे):-तालुक्यातील दिमाखवाडी येथील पीडित तरूणी सोबत प्रेम विवाह केल्यानंतर तिच्यावर सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. माहेरून पाच लाख रूपये घेऊन येण्याचा तकादा सासरच्या मंडळीकडून लावण्यात येत होता, याला नकार दिल्यानं नवरा, सासू आणि सासरा यांनी या तरूणीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गेवराई पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल दाखल केला होता. या प्रकरणी नवरा आणि सासरा यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गावातील एका मुलाबरोबर दोन वर्षापासुन पीडित तरूणीचे प्रेमसंबंध होते. याचे रुपातंर लग्नात झाले, मात्र लग्नाला अडीच महिन्यांचा कालावधी होतो न होतो तोवर सासरच्या तिला हिनवले जाऊ लागले.

वडिलाकडून पाच लाखं रूपये घेऊन ये असे म्हणत नवरा, सासू, सासरा यांनी छळाला सुरूवात केली. अनेकवेळा नवऱ्याने मारहाणदेखील केली. यानंर त्यांनी तरूणीला पेट्रोल अंगावर टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान ही पीडित तरूणी आत्महत्या कराण्याच्या मनस्थितीत गेली, परंतू नातेवाईकांनी वेळीच धाव घेऊन गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल केला. गेवराई पोलिसांनी चोवीस तासांत नवरा मुलगा अजय सुरेश राजगूडे व सासरा सुरेश सजदेव राजगूडे यांना दिमखावाडी येथून अटक केली असून सासू मात्र अद्याप फरार आहे. सदरची अटकेची कारवाई पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार, साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे, विठ्ठल देशमुख, अप्पा बळवंत गर्जे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here