




🔹गांगलवाडी यांच्या सौजन्याने विश्वशांती बुद्ध विहाराचा उद्घाटन सोहळा पंचशील चौक गांगलवाडी ठिकाणी संपन्न
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.17मे):-बौद्ध समाज गांगलवाडी यांच्या सौजन्याने विश्वशांती बुद्ध विहाराचा उद्घाटन सोहळा नुकताच पंचशील चौक गांगलवाडी या ठिकाणी बुध्द पौर्णिमेच्या पावन पर्वावर पार पडला.या विहाराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी समाजकल्याण सभापती प्रा.डॉ. राजेश कांबळे साहेब हे उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून माजी सामाजिक न्यायमंत्री डॉ.राजकुमार बडोले , सह उद्घाटक म्हणून गडचिरोली चे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे उपस्थित राहिले.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर सेलोकर साहेब, माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर , डॉ. आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी चे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे,गांगलवाडी चे सरपंच विवेक बनकर, रमलालजी दोणाडकर, सामजिक कार्यकर्ता प्रशांत डांगे ,लखन साखरे, डॉ. प्रेमलाल मेश्राम, मांयाबाई ठवकर, राजेंद्र टेंभुर्ने, पोलीस पाटील भोयर, गांगलवाडीचे बौद्ध समाज अध्यक्ष वसंता कराडे, सचिव अशोक कोसे आदी मान्यवर मंडळी या निमित्ताने उपस्थित राहिले.
विहाराच्या उद्घाटन प्रसंगी भाषण करताना डॉ. राजकुमार बडोले साहेबांनी समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक, सामाजिक, राजकीय ,सांस्कृतिक प्रगतीचे केंद्र बुद्ध कालापासून विहार होते आणि भविष्यातही हीच असली पाहिजेत असे प्रतिपादन केले. हे सांगत असताना जातक कथेच्या माध्यमातून त्यांनी बुद्ध धम्म संदेश उपस्थित जनसमुदायाला दिला.बुद्ध धम्म हा स्वकेंद्रित आहे. स्वतःचे प्रकाश स्वतः बना हा संदेश त्यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महिला मंडळींनी जो पुढाकार घेऊन विश्वशांती बुद्ध विहार गांगलवाडी साठी जे प्रयत्न केले ते फार प्रेरणादायी असून याचा आदर्श इतरही गावातील महिलांनी घ्यावा व बुध्द विहाराला संस्काराचे केंद्र बनवावे असा आशावाद व्यक्त केला. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्री मा.श्री. विजय वडेट्टीवार यांनी इतर समाजाप्रमानेच बौद्ध समाजासाठी सुध्दा नेहमी सकारात्मक भूमिका घेतल्या आहेत व समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात .
त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी बुद्ध काळापासून प्रसिद्ध असलेल्या विपश्यना कलेला प्रोत्साहन देण्याचे हेतूने राज्य सरकारच्या मदतीने विपश्यना केंद्र मंजूर करवून घेतला.हे एकूण बांधकाम पंधरा एकरवर असून पंचेचाळीस कोटीं त्यासाठी मंजूर करण्यात आले आहे अशी माहिती सांगितली. त्याचबरोबर हे नुसते राज्यातील नाही तर देशातील सर्वोत्तम विपश्यना केंद्रापैकी एक असेल हे या कार्यक्रमाच्यां वतीने आश्वस्त केले. ‘गाव तिथे विहार’ या भूमिकेचे समर्थन नेहमीच मंत्री विजय वडेट्टीवार करतात ही भूमिका सुद्धा त्यांनी स्पष्ट केली व या विहारातून समाजाची सर्वांगिण प्रगती होत राहो अश्या शुभेच्छा दिल्या.या विहराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी चार सत्रात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन श्री.सतिश डांगे यांनी केले तर आभार श्री. पद्माकर रामटेके यांनी मानले.




