Home गडचिरोली बुद्धांचा विचार समतेचा सेतू बांधणारा – महेंद्र ब्राम्हणवाडे

बुद्धांचा विचार समतेचा सेतू बांधणारा – महेंद्र ब्राम्हणवाडे

212

🔸अनुसूचित जाती विभाग काँग्रेस च्या वतीने गौतम बुद्धांना अभिवादन.

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.16मे):-बुद्धांचा विचार द्वेष भावनेतून बाहेर काढतो, बुद्ध माणसाच्या हृदयाला, मस्तकाला जोडणारा समतेचा सेतु आहे, त्या सेतुवरून जर आपण प्रवास केला तर कल्यानाच्या उच्च शिखरापर्यंत आपण पोहचू शकू असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले ते बुद्ध पौर्णिमा निमित्त अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी अनुसूचित जाती विभाग चे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, स्वयंरोजगार सेल जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक दिपक मडके, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, शामराव चापले, काशिनाथ भडके, अनुसूचित जाती महिला काँग्रेस अध्यक्ष अपर्णा खेवले, स्वयंरोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, डॉ.परशुराम खुणे, हरबाजी मोरे, सदाशिव कोडापे, जितेंद्र मूनघाटे, संजय चन्ने, मयुर गावतुरे, फिरोज हुद्दा, देशमुख, राकेश डोंगरे, पौर्णिमा भडके, विद्या कांबळे सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वांनी तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here