




✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.16मे):-अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव
घुग्घुस पंचशील चौक येथे बुध्द पौर्णिमेचा कार्यक्रम शांततेत पार पडला घुग्घुस येथील नवनिर्वाचित बौद्ध विहाराचे बांधकाम सुरू आहे त्या बांधकामाला शासकीय फंडातून न बनविता सर्व बौद्ध बांधवांनी स्वतः वर्गणी गोळा करुण ते स्मारक उभारण्यात आले.
भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सांगितले की भगवान बुद्ध प. पु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला माणुस म्हणुन जगण्याचा व माणसात आणुन आज समानतेचा अधिकार मिळवून दिला आधी आम्ही मागुण खायचे पण बाबासाहेबांमुळे आज कुणी नोकरीला आहे कुणी डॉक्टर वकील कुणी चांगले काम धंदे करत आहेत इतके सारे आम्हाला भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळाले आहेत तरी जर आज आम्ही मागुण जर विहार बनवित असेल किंवा कुठलाही कार्यक्रम करत असेल तर आम्ही कसली बाबासाहेबांची लेकरे म्हणून आम्ही शासकीय फंड न घेता शासकीय फंड योग्य शिक्षण औषधी दवाखाना उभारण्यात लागला पाहिजे समाजातील मुल मुले शिकतील तरच आपला देश प्रगती करेल तेव्हाच समाज समोर जाईल असे सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे वेळी माजी अध्यक्ष रमाबाई सातारडे यशोधरा महिला मंडळ तर्फे साडे बारा हजार रुपये भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष यांना देण्यात आला जय भीम युवा मंच तर्फे दुपारी खिरदान करण्यात आली सायंकाळी भोजनदान करण्यात आले या बुध्द पौर्णिमेचा दिनी लहान लहान जानु ग्रुप उन्नती भगत यांनी नृत्य सादर केले भिमराजकी बेटी या संगीतावर प्रौढ महिला सुध्दा उत्साहात होते कार्यक्रमचे आयोजन भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव व बौद्ध बांधव तर्फे करण्यात आला संचालन हेमंत पाझारे आभार प्रदर्शन रमाबाई सातारडे यांनी केला आणि कार्यक्रमाचे देख रेख चंद्रगुप्तभाऊ घागरगुंडे याच्या कळे होती यावेळेस दिगांबर बुरड, संभाजी पाटील नामदेव फुलकर प्रविण कांबळे पुनम कांबळे प्रतीमा कांबळे यशोधरा पाझारे उपस्थित होते




