Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूरच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूरच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

165

✒️लातूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

लातूर(दि.16मे):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची ३६५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील यांच्या हस्ते मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आले व शिवाजी चौकापर्यंत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक प्रसंगी जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा संघटक संजय राजुळे, संतोष सोनवणे, महादेव पोलदासे आदी पदाधिकाऱ्यांच्या घोषणेने छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमून निघाला.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, मेघा पाटील, संपादक दत्तात्रेय परळकर, डिगोळे सर, उत्तर भाग शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष सतीश करंडे व सर्व टीम, श्रुती जाधव, प्रतिक्षा पिटले, सुरज मद्देवाड विवेक मुळजे, भैय्या पिटले, समाधान डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कलाधीराज पथकाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी जन्मापासूनच त्यांच्यावर अनेक संकटे आली. मात्र, त्या संकटांच्या छाताडावर पाय रोऊन संभाजी महाराजांनी समर्थपणे झेप घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या खांद्यावर पेलली. इतकेच नाही तर अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबवल्या. कुठेही त्यांना कधीच अपयश आलं नाही. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होतं. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपलं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं होतं. हा जाज्वल्य इतिहास सर्वांनी अभ्यासावा असे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी आवाहन केले.यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हा पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व शंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here