




✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.15मे):- सेंट्रल रोड MIDC अंधेरी (पूर्व) MIDC पोलीस ठाणे समोरील MTNL च्या शासकीय कार्यालयाच्या जागेत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा बसविण्यास जागा देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव् डॉ. राजन माकणीकर यांनी इमेल द्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांना केली.
संपूर्ण जागा MTNL विभागाणे संरक्षण भिंतीने वेढून घेतले आहे,सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले सर महानगर टेलेफोन निगम लिमिटेड अंधेरी पूर्व MIDC येथे बाजूलाच हाकेच्या अंतरावर MIDC पोलीस ठाणे आहे.याच परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आहे, जागेच्या अभावी पुतळा बसवणे कठीण आहे.
मात्र; MTNL च्या मूळ रिक्काम्या जागेतील सेंटर रोड कडील बाजू आणी आंबेडकर नगर ला जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेकडील
जिथे पिंपळ बोधी वृक्ष आहे त्या जमिनीचा काही भु-भाग पुतळा उभारणी व सुशोभीकरण द्यावा.
अशी मागणी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर, कॅ. श्रावण गायकवाड, विजय चव्हाण, शिवा राठोड, ह्ररिभाऊ कांबळे, सचीन भूटकर, योगेश गायकवाड, डॉ. अतिकूर चौधरी, राजेश पिल्लाई, भीमकन्या रानीताई माकणीकर यांनी केली आहे.




