Home महाराष्ट्र आ.गुट्टे यांच्या हस्ते ६० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन

आ.गुट्टे यांच्या हस्ते ६० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन

101

🔸मौजे गोपा येथे रंगला उद्घाटन सोहळा

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि 15मे):- तालुक्यातील मरडसगाव जिल्हा परिषद अंतर्गत मौजे गोपा येथे मा. जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादराव मुरकुटे यांच्या प्रयत्नाने सबंधित विभागाकडून मंजूर झालेल्या व पूर्णत्वास गेलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.
त्यामध्ये…..

१. गोपा ते MSH-16 नाव्हलगाव रोड VR-93 SRF अंतर्गत रस्ता करण्यासाठी :- १४ लक्ष रुपये.
२. मातोश्री पांदण रस्ता योजने अंतर्गत पिंपळ विहीर ते मासोळी नदी रस्ता :- २४ लक्ष रुपये.
३. जि. प. शाळा खोली बांधकाम करणे :- ९ लक्ष रुपये.
४. जनसुविधा अंतर्गत सिमेंट रोड करणे :- ५ लक्ष रुपये.
५. १५ वा वित्त आयोग अंतर्गत सिमेंट रोड करणे :- २.७५ लक्ष रुपये.
६. १५ वा वित्त आयोग अंतर्गत नाली बांधकाम करणे :- २ लक्ष रुपये.
७. १५ वा वित्त आयोग अंतर्गत पाणीपुरवठा दुरुस्ती करणे :- ३ लक्ष रुपये.

अशा एकूण ५९.७५ लक्ष रुपयाच्या कामाचे उद्घाटन आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले हा उद्घाटन सोहळा मौजे गोपा येथे संपन्न झाला.या भागात सर्वांत जास्त विकास कामे झालेली आहेत. या कामांची पोचपावती म्हणून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणूकित मतदान रुपी सहकार्य करून आपल्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यायचे आहे. या विकास कामांचा गावासह परिसरातील नागरिकांना निश्चित फायदाच होणार असून या ठिकाणी उर्वरीत सुचवलेली विकास कामे लवकरच पूर्ण करणार असल्याचेही आमदार गुट्टे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य गणेशराव दादा रोकडे, जि.प.सदस्य किशनराव भोसले, जि. प.सदस्य प्रल्हादराव मुरकुटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष साहेबराव शिंदे, सरपंच मुंजाजी कदम, माजी सरपंच प्रल्हादराव कदम, उपसरपंच गोविंदराव बोबडे, संजय काळे, ग्रा.पं. सदस्य राजेश बोबडे, ग्रा.प. सदस्य केशव कदम, ग्रा. प. सदस्य गौतम मस्के, ग्रा.प. सदस्य ज्ञानोबा भुसनर, ग्रा.प. सदस्य मधुकर हुरगुळे, नारायणराव बोबडे, रावसाहेब चंदे, ज्ञानोबा मोटे, ज्ञानदेव कदम, विनायक कदम, तुळशीराम कदम, गोविंदराव मोटे, गणेशराव बोबडे, गंगाराम भुसनर सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here