Home महाराष्ट्र रक्तसाठ्याचा तुटवडा असल्याने रक्तदानासाठी पुढे यावे

रक्तसाठ्याचा तुटवडा असल्याने रक्तदानासाठी पुढे यावे

79

🔹विदर्भ ब्लड सेवा ग्रुपचे सदस्य मयूर प्रदीपराव मेश्राम यांचे आवाहन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.14 मे ):-कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्वावर मोठे संकट निर्माण झाले होते. मात्र देशातील नागरिकांनी मोठ्या हिंमतीने या संकटाला सामोरे जात परिस्थितीवर मात केली. आता रक्ताच्या तुटवडयाची समस्या असून यासाठी आपण सर्वांनी पुढे येऊन रक्त संकलनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरासह जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा मोठ्या प्रमाणावर घटला असून, रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे.

कोरोनामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करण्याकडे पाठ फिरवली आहे. याशिवाय सेवाभावी संघटना, शाळा-महाविद्यालये, वतीने होणाऱ्या रक्तदान शिबिरांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे रक्ताचा पुरवठा कमी झाला आहे. अशा परिस्थितीत मागणी जास्त आणि उपलब्धता कमी झाल्याने ही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे,

कोरोना काळात रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रक्तसाठा वापरला गेला. मात्र त्या काळात रक्तदान शिबीरे आयोजन करण्यासाठी मर्यादा असल्याने नव्याने रक्त संकलन होऊ शकले नाही. परिणामी आता रक्त साठ्याचा तुटवडा निर्माण झाला असून रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन युवा सामाजिक कार्यकर्ता मयुर प्रदीपराव मेश्राम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here