



✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308
कुरुल(दि.15मे):-शासनाच्या इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मध्यान्ह योजनेअंतर्गत कुरुल येथील श्रमिक वसाहत असलेल्या संभाजीनगर येथे तीनशे लोकांना मोफत अन्न वाटप सुरू करण्यात आले आहे .भाजपच्या जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष लिंगदेव निकम व तालुका उपाध्यक्ष माऊली भगरे यांच्या सहकार्याने ही मोफत अन्न वाटप योजना सुरू करण्यात आली आहे .
भीमा साखर कारखान्याचे संचालक चंद्रसेन जाधव, उद्योजक लिंगदेव निकम,उपाध्यक्ष माऊली भगरे यांच्या हस्ते श्रमिकांना अन्न वाटप करून याचा शुभारंभ करण्यात आला .यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव,शिवसेनेचे तालुका उपप्रमुख विनोद आंबरे,हरी जाधव,महावीर पुजारी, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश कुलकर्णी,सुहास घोडके, सुभाष शिंदे, राजकुमार बाळसराफ, संजय कुलकर्णी, सिद्धेश्वर सलगर,लालू बागवान,अल्ताफ बागवान,
आदिंसह कार्यकर्ते व कामगार ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .





