Home महाराष्ट्र गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न

90

✒️पाचोरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पाचोरा(दि.15मे):- येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांचे करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान करिअर मार्गदर्शन शिबिरात शुक्रवार दिनांक 13 मे 2022 रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रेम शामनाणी हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमिना बोहरा यांनी केले.
गुरुकुल , बुरहानी व इतर शाळा , महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी इयत्ता दहावी व बारावीनंतर करिअरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन केले .जेईई ,नीट ,
इंजिनीअरिंग सीईटी,फार्मसी सिईटी ,हॉटेल मॅनेजमेंट ,वाणिज्य शाखेतील करिअरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी ,रेल्वे ,स्टाफ सिलेक्शन कमिशन यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांविषयी देखील प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी मार्गदर्शन केले . इयत्ता बारावी नंतर आपल्या क्षमतेनुसार व आवडीनुसार करिअर निवडून त्यात यशाचा टप्पा गाठावा ,स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून शाळेचे व परिसराचे नाव उज्वल करावे अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रेम शामनाणी यांनी विद्यार्थ्यांच्या करियर निवडीसाठी व स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विविध उपक्रमांची माहिती दिली .तसेच नुकत्याच शाळेत सुरु केलेल्या स्पर्धापरीक्षा वाचनालय व ई लायब्ररी च्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमातील संकल्पना सोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले .कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना आपली क्षमता व आवड ओळखून यशाचे शिखर गाठा अशाप्रकारच्या शुभेच्छा प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन आमेना बोहरा मॅडम यांनी केले. कार्यक्रमास पालक ,शिक्षक व शाळेतील आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल शामनानी, अंकुश शामनानी , दुर्गेश शेलार व सर्व शिक्षक बंधूंनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here