Home महाराष्ट्र राजे संभाजीनगर येथे भारतीय विद्यार्थी मोर्चा द्वारे,छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

राजे संभाजीनगर येथे भारतीय विद्यार्थी मोर्चा द्वारे,छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

265

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.14 मे) बहुजन प्रतिपालक,शकतविर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उमरखेड येथील आदर्श उदाहरण असलेलं सामाजिक सलोखा जपणारे राजे संभाजी नगर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राजे संभाजी नगर च्या फलकाचे पुष्पमाला अर्पण करून, हापसे साहेब, वाळुक्कर सर,सूर्यवंशी सर, मेजर संभाजी पाईकराव, सारनाथजी रोकडे,यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती म्हणून चक्रधर पाटिल देवसरकर, SBI मॅनेजर धम्मपाल नरवाडे, सुरेश मुनेश्र्वर, वर्षाताई देवसरकर,उत्तम राठोड, मुनेश्र्वर सर हे होते.

यावेळी अठरापगड जातींतील बहुजन मावळ्यांनी अशाच प्रकारे एकत्र येऊन महापुरुषांचे जयंती, स्मृतिदिन साजरे करावेत.

आणि सर्वांना एकत्र करून राष्ट्रोद्धार करुन महापुरुषांचे राहिलेले अधुरी कार्य पूर्ण करावे. असे प्रतिपादन चक्रधर पाटील देवसरकर यांनी केले.तर युवकांनी आर्थिक समृद्धीकडे सुद्धा भर द्यायला हवा.

विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन व्यावसायीक क्षेत्राकडे सुद्धा वाटचाल करून नावलौकिक करावा असे धम्मापल नरवाडे यांनी येथे बोलताना सांगितले.

तसेच श्रीधर पाटील देवसरकर यांनी युवकांनी निर्व्यसनी होऊन आयुष्यात वाटचाल करावी असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाची अध्यक्षता, विद्वान केवटे.(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष BBM) यांनी केली.

लेखणी आणि तलवार एकच वेळी चालवून समतेच्या स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या क्रांतिकारी विचार व कार्यातून वर्तमान युवकांनी प्रेरणा घेऊन वाटचाल करावी. असे म्हणत भारतीय विद्यार्थी मोर्चाद्वारे, नगरात होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी, गुलाब जाधव,दिनेश माने, विठ्ठल पोटे,संतोष पिंपळे,रोहिदास राठोड,प्रमोद वाळुकर,धुळे सर,पाटील सर,राहुल कांबळे, खर्चे सर,शामराव केवटे,वामन कांबळे,गौतम बरडे,परमानंद खांडरे, बाबुसिंग पवार,रविराज धोटे, यांसह मोठ्या संख्येने नगरातील ज्येष्ठ मंडळी उपस्थीत होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे शहराध्यक्ष, बुद्धभूषण पठाडे तसेच अतुल धुळे, संदेश पठाडे, तेजस सावंत,अनिल जाधव, संबोधी राऊत,साहिल राऊत,ऋषीकेश देवसरकर, आर्यन पाईकराव,आदित्य वाळुकर, सौरभ पाईकराव, हर्षदीप बरडे, आर्यन आडे, आदित्य विनकरे, यांनी परिश्रम घेतले.

तर आभार प्रदर्शन आकाश बबुसिंग पवार यांनी केले.
खाऊ वाटपाणे या कार्यक्रमाची सांगता झाली.

राजे संभाजी नगर येथे अठरापगड जातींतील महापुरूषांच्या जयंत्या प्रबोधन करून साजऱ्या केल्या जातात. हे नगर उमरखेड मधील, सामाजिक सलोखा जपणारे, समता नांदविनारे नगर म्हणून नगरवसियांचे सर्वत्र कौतुक व नावलौकिक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here