




✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.14मे):- शहरातील पारमिता बुध्दविहार महाविरनगर येथे भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा पुसद वतीने तथागत भगवान बुद्धांच्या जयंती निमित्ताने दि.१३ मे ते२२मे २०२२पर्यंत दहा दिवशीय बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे उध्दाघाटन आज करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष ,माजी सैनिक भारत कांबळे,संगणायक भदंत बि.बुध्दपाल चैत्यभूमी मुंबई,उध्दाटक रवी भगत जिल्हा अध्यक्ष, मार्गदर्शक म्हणून ज्ञानोबा कांबळे केंद्रीय शिक्षक मुंबई, यांच्या उपस्थितीमध्ये तथागत भगवान बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून सामुहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
या बौद्धाचार्य श्रामनेर शिबिरामध्ये एकुण २२ प्रशिक्षणार्थींनी बौद्धाचार्य श्रामणेरांनी प्रवज्जा घेतली. यावेळी रवी भगत, ज्ञानोबा कांबळे यांनी मार्गदर्शन केले. दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर भिक्खू संघास फल्हार दानकर्ते श्रीधर पाटिल व बाळु गायकवाड यांनी सपत्नीक सहपरिवार येऊन दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन धुळे यांनी केले तर आभार संतोष सोनुने यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद,शहरशाखेचे पदाधिकारी सदस्य मंडळी व महिला शाखा महाविरनगर ,सुदर्शन नगर ,शिवाजी वार्ड , गांधीनगर ,सुभाषवार्ड ,तसेच पारमिता महिला मंडळ महाविरनगर हे अथक परिश्रम घेतत आहेत.




