Home महाराष्ट्र भिम,बुद्ध जयंतीचा उत्सव आणि पुढील दिशा!

भिम,बुद्ध जयंतीचा उत्सव आणि पुढील दिशा!

285

डॉ बाबासाहेब आंबेडकार यांची १२९ वी,१३० वी जयंती होते. कारण नेहमीच निळे वादळ ठरणारी भिम जयंती प्रथमच दोन वर्षे शांततेने साजरी झाली. दरवर्षी भिम जयंती निमित्त जाती व्यवस्था खेडया पाडयातच नव्हे तर शहरी भागात डोके वर काढण्याचा प्रयत्न करते. दोन वर्षात तशी घटना घडली नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटाळून हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिरपणे धम्मदीक्षा घेतली होती. हे काही लोक विसरतात. म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकार यांची १३१ वी जयंती असो या बुद्धाची (२०६७ वी ) जयंती असो आम्हाला समाजात कोणताही बदल झाला असे म्हणता येत नाही किंवा बदल झाला नाही असे ही म्हणता येत नाही. उत्सव महत्वाचा वाटतो.विचार आणि त्यानुसार आचरण असणारा संघ कुठे ही दिसत नाही. दोन वर्षे भिम जयंती साजरी न करणाऱ्यांनी १३१ वी जयंती खूप जोशात उत्स्फूर्तपणे साजरी केली.दोन चार दिवस जयंती उत्सव साजरा करण्यासाठी एक महिना सर्व व्यक्तिगत,राजकीय वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन एकदिलाने संघ शक्ती दाखवून दिली.मी अनेकांना विचारले आपली पुढची दिशा काय असेल.

मतदारसंघात आपण ही संघ शक्ती एकगठ्ठा मतदान करून कायमस्वरूपी ठेऊ शकतो काय?.यांचे उत्तर कोणाकडेच नव्हते निवडणूकीच्या वेळी नेते जे ठरवतील ते पाहू.आज आपण एकत्र आलो ते नेत्याच्या सांगण्या वरून नाही तर आपला निर्णय आपण घेतला. निवडणूकीत ही आपल्या मतदारसंघाचा निर्णय आपण घेऊ नां.यावेळी बुद्धाच्या संदेशाची आठवण येते.

बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.तोच खरा धम्मोधर असतो. धम्म उपासक उपासिका बनण्या करीता स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.त्यामुळे आपली सामाजिक आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल असा सोप्या भाषेत सांगणारे बुद्ध आम्हाला आजही समजले नाही. म्हणूनच आम्ही भिम,बुद्ध जयंती उत्स्फूर्तपणे साजरी करतो, पण पुढची दिशा ठरवत नाही. कारण संघ नाही, संघाला धम्माची संहिता नाही. मग बुद्धाचे विचार आणि बाबासाहेबांचे संविधानातील नियम कसे लागू होतील.
बुद्ध पोर्णिमा जगातील मानवाच्या दुष्टीने खूप महत्वपूर्ण सण,उत्सव आहे. तो वेगवेगळ्या देशात वेग वेगळ्या नांवाने ओळखला जातो.बुद्ध पौर्णिमेच्या दिवसी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला. याच दिवशी सात वर्ष कठोर तपचार्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते.आणि याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे महापारीनिर्वान झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते, अंत दिप भव,स्वयं प्रकाशीत व्हा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शासन करती जमात व्हा. या दोन महान संदेशाचा आम्ही अर्थच समजुन घेतला नाही.

कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही. प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका असे बुद्ध नेहमी सांगत होते. विचारावर विस्वास ठेउन प्रमाणिक पणे वागलात तर तुम्हाला आयुष्य हसवेल, तेव्हा समजा की हे चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. याची आठवन आपल्याला अन्याय अत्याचार व हत्याकांड झाल्यावरच येते. बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यत आठवत नाही. ते म्हणतात संघ बडा बलवान संघ करेगा सबकी रक्षा क्यो की संघ बडा बलवान.धर्मांतरीत आंबेडकारी समाज, संघ, संघटना आणि पक्ष विचारधाराच मानत नाही. हे मान्य करीत नाही.म्हणुन इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.हे रिपब्लिकन आणि आंबेडकरी समाजाला कोण सांगेल?

आंबेडकर आणि बुद्ध जयंती साजरी केलीच पाहिजे पण विचारधारे नुसार आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून पुढच्या दिशा ठरविता आल्या तर त्याला महत्व प्राप्त होते.युद्ध नको बुद्ध हवा म्हणायचे आणि आर एस एस च्या प्रत्येक घटना कडे लक्ष ठेउन स्वताचा कार्यकर्म ठरवायचा. म्हणजे तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.ते त्यांचा विषमतावादी असमानता निर्माण करणारे विचार मांडत राहतील.तुम्हाला समता,स्वत्रंत, बंधुभाव निर्माण करणारे विचार सतत मांडत रहावे लागतील. त्या नुसार समाजात चर्चा बैठका घेउन सातत्य ठेवावे लागेल. दोन चार दिवस जयंत्या साजऱ्या करण्यापुर्त्या मतभेद दूर होणार असतील तर,केवळ जयंती साजरी करून आपसातील मतभेद दूर होणार नसतील तर जयंती साजरी करण्याचा अर्थ काय?.

माणसाच्या संघाने संघटने पक्षाने जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नये,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.हे आजच्या आंबेडकरी चळवळीला कोण सांगेल? बुद्ध म्हणतात काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता.त्यात सर्वोचस्थानी आपन पोचु शकतो. स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक गोष्टीचे चिंतन सतत केले पाहिजे. संघर्ष केल्या शिवाय जीवनात काहीच मिळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. म्हणुनच बुद्ध विहारे ही समाजाची समाज परिवर्तनाची केंद असायला पाहिजे होती. पण बहुसंख्य विहारे व्यक्तिगत आणि राजकीय मतभेदामुळे बंद असतात. त्याबाबत कोणीच गांभीर्याने चर्चा संवाद परिसंवाद करीत नाही. मग मार्ग कसा निघेल. मग दरवर्षी भिम, बुद्ध जयंतीचा उत्सव साजरा करण्याचा उदेश काय जर त्यातुन पुढील दिशा ठरत नसेल तर?

श्रीलंका, थायलंड, बर्मासह १८० देशात भव्य बुद्ध विहारे ही शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे केंद्र असतात. तिथे शिस्तबद्ध आचरणात सर्व व्यवहार होतात. एक दिवस विशेष बुद्ध जयंती साजरी करून त्यांना काहीच बदल अपेक्षित नसतो. समाजातील चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवु शकत नाही.जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे, मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.म्हणजे समाजात बदल घडेल. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.अडीच हजार वर्षा पूर्वी बुद्धानी मानव कल्याणा साठी सांगितलेला संदेश आज ही एकूण मानव जाती साठी खुप उपयोगी आहे.व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा होईल.जर समाजातील व्यक्तीचा विकास झाला नाही तर समाज काय करेल व्यक्ति एकत्र आल्या तर समाज तयार होतो.समाज एकत्र आला तर संघ,संघटना आणि पक्ष तयार होतो. मग तो मानव कल्याणा करीता मानव मुक्तीचा मार्ग खुला करतो.आज देशात भिख्खु संघ संघटित नाही.त्यामुले देशातील उपासक उपासिका यांचा ही संघ संघटना संघटित नाही.डॉ बाबासाहेबांनी दिलेला धम्म किती ही चांगला असला तरी तो आत्मसात करण्यात आपन कुठे तरी कमी पडतो.म्हणुन तमाम आंबेडकरी चळवळीतील बौद्ध बांधवास बुद्ध जयंती निमित्याने स्वताचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून बुद्धाला त्यांच्या धम्माला शरण जा आणि संघ शक्ति बनवा. बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना.भिम,बुद्ध जयंतीचा उत्सव आणि पुढील दिशा ठरवा.हिच सर्वाना नम्र विनंती, आणि बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक मंगल कामना!!!.सबका मंगल हो !!!

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)(बुद्ध,धम्म,संघ अभ्यासक, प्रचारक, प्रसारक)मो:-९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here