



✒️हानमंत चंदनकर(विशेष प्रतिनिधी)
नांदेड(दि.14मे):- – महान आंबेडकरी जलसाकार, वामनदादा कर्डक याच्या जन्मशताब्दी निमित्त्य नांदेड येथील मिलींद एंगडे साहित्य नगरी कुसुम सभागृह नांदेड येथे दिनांक 21/5/2022 रोज शनिवारी सकाळी 11 वाजता पासून सुरुवात होणार आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक मा.मिलिंद पा शिंन्दे (प्रसिद्ध सिने अभिनेते)संमेलन अध्यक्ष बबन जोगदंड, गौरव मुर्ती दत्ता भगत, प्रज्ञाधर ढवळे अध्यक्ष संयोजक समिती, बालाजी इबितदार स्वागत अध्यक्ष पि.जी. मिसाळे निमंत्रणक यासोबतच सायंकाळी 6 वाजता बहारदार कवि संमेलन होणार असून या कविसंमेलनाचे अध्यक्ष मा अनुरत्न वाघमारे(विद्रोही कवि)राहाणार आहेत यात नागोराव डोंगरे सर सहभागी कविचे कविसंमेलन संपन्न होणार आहे तरी साहित्यप्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य संमेलनात मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे ….





